शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

corona virus : फलटण तालुक्यात दहा शिक्षक, कर्मचारी बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2020 2:06 PM

coronavirus, school, teacher, educationsector, sataranews कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर बंद असलेल्या प्राथमिक व माध्यमिक शाळांपैकी माध्यमिक विभागातील इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याच्या दृष्टीने प्रशासनाने संबंधित शिक्षण संस्था, पालक, शिक्षक यांच्याशी संपर्क करून, शाळा व्यवस्थापन समित्यांच्या बैठका घेऊन शासनाने घालून दिलेल्या नियम निकषानुसार सर्व व्यवस्था पूर्ण झाल्याची माहिती प्रभारी गट शिक्षणाधिकारी आर. व्ही. गंबरे यांनी दिली आहे.

ठळक मुद्देफलटण तालुक्यात दहा शिक्षक, कर्मचारी बाधितशाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांची ऑक्सिमीटर व थर्मल गनद्वारे तपासणी

फलटण : कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर बंद असलेल्या प्राथमिक व माध्यमिक शाळांपैकी माध्यमिक विभागातील इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याच्या दृष्टीने प्रशासनाने संबंधित शिक्षण संस्था, पालक, शिक्षक यांच्याशी संपर्क करून, शाळा व्यवस्थापन समित्यांच्या बैठका घेऊन शासनाने घालून दिलेल्या नियम निकषानुसार सर्व व्यवस्था पूर्ण झाल्याची माहिती प्रभारी गट शिक्षणाधिकारी आर. व्ही. गंबरे यांनी दिली आहे.फलटण तालुक्यात एकूण ८० माध्यमिक विद्यालये असून, त्यामध्ये नववी ते बारावी या वर्गात १७ हजार ३२४ विद्यार्थी शिक्षण घेत असून १ हजार ८४ शिक्षक अध्यापनाचे काम करीत आहेत. शासनाने दिलेल्या निर्देशानुसार या सर्व माध्यमिक शिक्षकांची व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोविड चाचणी पूर्ण करण्यात आली आहे.

त्यापैकी सुमारे दहा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्ऱ्यांची चाचणी पॉझिटिव्ह असल्याचे नमूद करीत सर्व ८० विद्यालयांतील शाळा खोल्यांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे प्रत्यक्ष शाळा सुरू होण्याच्या दिवसापासून शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांची ऑक्सिमीटर व थर्मल गनद्वारे तपासणी करण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी आर. व्ही. गंबरे यांनी सांगितले.सर्व ८० माध्यमिक विद्यालयांमधील शाळा व्यवस्थापन समित्यांच्या बैठका घेण्यात आल्या असून, बहुसंख्य ठिकाणी या समित्यांचे सदस्य कमी अधिक प्रमाणात उपस्थित राहिले असून, त्यांनी शाळा सुरू करण्यास संमती दर्शविली आहे. पालकांची संमतीपत्रके ५० टक्केपर्यंत उपलब्ध झाली असून, प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्यानंतर उर्वरित पालकांची संमतीपत्रे उपलब्ध होतील अशी अपेक्षा असून, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व पालकांनी शाळा सुरु करण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे आर.व्ही.गंबरे यांनी सांगितले.

इयत्ता ९ वी ते १२ वी या वर्गांसाठी प्रत्यक्ष शाळा सुरू करण्यात येणार असून, उर्वरित प्राथमिक व माध्यमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षण व्यवस्था कार्यान्वित राहणार असल्याचे प्रभारी गट शिक्षणाधिकारी आर. व्ही. गंबरे यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSchoolशाळाEducation Sectorशिक्षण क्षेत्रkolhapurकोल्हापूर