corona virus in satara- किराणा दुकानात गुढीपाडव्याचे साहित्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 18:29 IST2020-03-25T18:25:30+5:302020-03-25T18:29:31+5:30
सातारा येथील मंगळवार पेठेत असणाऱ्या शर्वरी जनरल स्टोअर्स या दुकानात पाडव्यासाठी लागणारे साहित्य विक्री केल्याचे आढळून आले.

corona virus in satara- किराणा दुकानात गुढीपाडव्याचे साहित्य
सातारा : येथील मंगळवार पेठेत असणाऱ्या शर्वरी जनरल स्टोअर्स या दुकानात पाडव्यासाठी लागणारे साहित्य विक्री केल्याचे आढळून आले.
संबंधित दुकान मालकाने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचे समोर आले असून, याप्रकरणी दुकान मालक प्रशांत पांडुरंग देशमुख (रा. गेंडामाळ, सातारा) यांच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, शाहूपुरी पोलीस ठाण्याचे हवालदार धनंजय कुंभार हे मंगळवार दि. २४ रोजी मंगळवार पेठ परिसरात पेट्रोलिंग करत असताना सुशीला वसंतविहार अपार्टमेंटमधील शर्वरी जनरल स्टोअर्स हे सुरू असल्याचे दिसले.
या दुकानात किराणा मालाव्यतिरिक्त गुढीपाडव्यासाठी लागणारे साहित्य विक्री करत असल्याचे आढळून आले. त्यामुळे दुकान मालक देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.