corona virus :जिल्ह्यात आणखी चारजणांचा कोरोनामुळे मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 17:14 IST2020-12-11T17:13:25+5:302020-12-11T17:14:41+5:30
CoronaVirus, Hospital, Sataranews सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांचे मृत्यूसत्र सुरूच असून, शुक्रवारी आणखी चार जणांचा मृत्यू झाला. यामुळे मृतांचा आकडा १ हजार ७६० वर पोहोचला आहे.

corona virus :जिल्ह्यात आणखी चारजणांचा कोरोनामुळे मृत्यू
सातारा: जिल्ह्यात कोरोना बाधितांचे मृत्यूसत्र सुरूच असून, शुक्रवारी आणखी चार जणांचा मृत्यू झाला. यामुळे मृतांचा आकडा १ हजार ७६० वर पोहोचला आहे.
जिल्ह्यात गत आठ महिन्यांपासून दिवसागणिक मृत्यूसत्र सुरूच आहे. कोरोनामुळे मृत्यू झाला नाही, असा एकही दिवस गेला नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासन अधिक चिंतेत पडत आहे.
गुरुवारी रात्री १२२ जणांचे अहवाल कोरोना बाधित आढळून आले असून, यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये दिवड (ता. माण) येथील ७० वर्षीय पुरुष, भाडळे, (ता. कोरेगाव) येथील ८६ वर्षीय पुरुष, दौलतनगर सातारा येथील ७२ वर्षीय पुरुष तसेच कर्डी, (ता. कऱ्हाड) येथील ५५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. दरम्यान, जिल्ह्यात कोरोना मुक्तीचेही प्रमाण वाढले असून, आतापर्यंत ५० हजार १७४ नागरिकांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.