corona virus : तळबीडच्या विलगीकरण कक्षात भजनाद्वारे मनोरंजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2021 17:59 IST2021-06-07T17:54:59+5:302021-06-07T17:59:48+5:30
CoronaVirus Satara : तळबीड येथे लोकवर्गणीतून श्री चंद्रसेन महाराज विलगीकरण कक्ष करण्यात आला असून या कक्षात उपचार घेणाऱ्या रूग्णाच्या मनोरंजनासाठी दररोज संध्याकाळी भजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.या विलगीकरण कक्षात सद्या ३६ रुग्ण उपचार घेत असून ४१ रुग्ण उपचार घेऊन बाहेर पडले आहेत.

corona virus : तळबीडच्या विलगीकरण कक्षात भजनाद्वारे मनोरंजन
उंब्रज : तळबीड येथे लोकवर्गणीतून श्री चंद्रसेन महाराज विलगीकरण कक्ष करण्यात आला असून या कक्षात उपचार घेणाऱ्या रूग्णाच्या मनोरंजनासाठी दररोज संध्याकाळी भजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.या विलगीकरण कक्षात सद्या ३६ रुग्ण उपचार घेत असून ४१ रुग्ण उपचार घेऊन बाहेर पडले आहेत.
हा विलगीकरण कक्ष स्थापन करण्यापासून ते रुग्णाना सर्वसोयी पुरवण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य दुर्गेशराव मोहिते यांनी पुढाकार घेतला आहे.त्याच्या नेतृत्वाखाली सकाळी राजेंद्र गायकवाड व सचिन शहा हे रुग्णांची योगासने व कवायत घेतात. रुग्णांच्या करमणुकीसाठी तळबीड येथील साई राम भजनी मंडळ यांच्या वतीने भजनासह सुगम संगीताच्या कार्यक्रम घेण्यात येतो.
रूग्णाच्या वर उपचार करण्यासाठी उंब्रज प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ संजय कुंभार व त्यांची टीम काम करत असून या विलगीकरण कक्षात स्वयंसेवक म्हणून दुर्गशराव मोहिते यांच्यासह उपसरपंच लालासो वाघमारे.ग्रामपंचायत सदस्य अभिजीत गायकवाड,मिथुन शिंदे, उमेश मोहिते, नीयाज मुलानी, विनोद मोहिते, विशाल मोहिते, अभय मोहिते राजेंद्र गायकवाड सचिन शहा चंद्रकांत चव्हाण, सागर शिवदास विजय कुंभार, प्रशांत कुंभार, धनाजी कुंभार, राहुल कुंभार, जयवंत मानकर, विजय माने, विश्वनाथ चव्हाण, शिवाजी जिरंगे, विश्वजीत मोहिते (फौजी) प्रशांत मोहिते, मिलिंद मोहिते विशाल मोहिते, रोहित मोहिते हे स्वयंसेवक रात्रंदिवस रुग्णाना मदत करताना दिसून येत आहेत.