corona virus : सातारा जिल्ह्यात दिवसभरात कोरोनाने १५ जणांचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 18:17 IST2020-08-31T18:15:53+5:302020-08-31T18:17:11+5:30
सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या मृतांचा आकडा वाढतच असून, सोमवारी आणखी १५ जणांचा कोरोनामुळे बळी गेला. यामुळे बळींचा आकडा आता ३९७ वर पोहचला आहे. तसेच रविवारी रात्री ४८९ जणांचे अहवाल कोरोना बाधित आले.

corona virus : सातारा जिल्ह्यात दिवसभरात कोरोनाने १५ जणांचा बळी
सातारा: जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या मृतांचा आकडा वाढतच असून, सोमवारी आणखी १५ जणांचा कोरोनामुळे बळी गेला. यामुळे बळींचा आकडा आता ३९७ वर पोहचला आहे. तसेच रविवारी रात्री ४८९ जणांचे अहवाल कोरोना बाधित आले.
जिल्ह्यात सोमवारी तब्बल १५ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला. त्यामध्ये कडगांव, ता. पाटण येथील ७९ वर्षीय महिला, दुर्गापेठ सातारा येथील ७० वर्षीय पुरुष, राजापुरी, ता. खटाव येथील ३० वर्षीय महिला, गुरुवार पेठ सातारा येथील ६७ वर्षीय पुरुष, कवडेवाडी, ता. कोरेगांव येथील ७५ वर्षीय पुरुष, जावळे, ता. फलटण येथील ५८ वर्षीय महिलेचा समावेश आहे.
तसेच पाटण येथील ७६ वर्षीय महिला, गोळेश्वर कराड येथील ५५ वर्षीय पुरुष, पापर्डे, ता. पाटण येथील ५२ वर्षीय पुरुष, शनिवार पेठ कराड येथील ५७ वर्षीय महिला, शिरवळ, ता. खंडाळा येथील ६४ वर्षीय पुरुष, पुसेगांव, ता. खटाव येथील ७९ वर्षीय पुरुष, म्हसवड, ता. माण येथील ५८ वर्षीय पुरुष, पुसेसावळी, ता. खटाव येथील ६० वर्षीय पुरुष, भाटी, ता. माण येथील ५५ वर्षीय महिलेचा समावेश आहे.