शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
3
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
4
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
5
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
6
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
7
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
8
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
9
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
10
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
11
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
12
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
13
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
14
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
15
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
16
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
17
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
18
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
19
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
20
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात

corona virus : जिल्ह्यात आणखी २२ जणांचा कोरोनाने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2020 4:38 PM

corona virus, sataranews, hospital सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा तसेच मृतांची संख्याही कमी होत आहे. मंगळवारी नवीन २२ बाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे बळींच्या संख्या १२७३ झाली.

ठळक मुद्देजिल्ह्यात आणखी २२ जणांचा कोरोनाने मृत्यूमृतांची संख्या १२७३ ; बाधितांच्या संख्येतही घट

सातारा : जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा तसेच मृतांची संख्याही कमी होत आहे. मंगळवारी नवीन २२ बाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे बळींच्या संख्या १२७३ झाली.जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता कमी-कमी होत चालली आहे. सोमवारी रात्री आलेल्या अहवालानुसार ३१२ जणांचे अहवाल बाधित आले आहेत. तर मंगळवारी दुपारपर्यंत नवीन २२ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले.

सोमवारी रात्रीच्या अहवालानुसार जिल्ह्यातील सातारा, कऱ्हाड , फलटण, वाई, खंडाळा, महाबळेश्वर, माण, खटाव, पाटण, कोरेगाव आणि जावळी तालुक्यात नवीन रुग्ण आढळले. इतर जिल्ह्यातीलही काहीजणांची साताऱ्यात बाधित म्हणून नोंद झाली आहे.मंगळवारी दुपारपर्यंत नवीन २२ बाधितांचा मृत्यू झाला. यामध्ये जिल्हा शासकीय रुग्णालयात खटाव तालुक्यातील पुसेगावमधील ८० वर्षीय पुरुष, जावळी तालुक्यातील सोनगाव येथील ५२ वर्षीय पुरुष, सातारा तालुक्यातील शिवथर येथील ४९ वर्षांचा पुरुष, कळंबेतील ६० वर्षांचा वृध्द, देगावमधील ७० वर्षांची महिला यांचा मृत्यू झाला. तसेच येनके (ता. कऱ्हाड ) येथील ८० वर्षीय वृध्द, पाटण तालुक्यातील खराडवाडी येथील ५१ वर्षीय पुरुष, अंबळेमधील ७० वर्षीय वृध्द यांचाही कोरोनाने बळी गेला आहे.जिल्ह्यातील विविध खासगी रुग्णालयांमध्ये खटाव तालुक्यातील सिद्धेश्वर कुरोली येथील ८० वर्षीय पुरुष, राजापूरमधील ७० वर्षांची महिला, कऱ्हाड तालुक्यातील कोडोली येथील ७६ वर्षीय पुरुष, कऱ्हाडमधील ६० वर्षांची वृध्दा तसेच वरकुटे मलवडी (ता. माण) येथील ७७ वर्षीय पुरुष, अंगापूर वंदन (ता. सातारा) येथील ८३ वर्षांचा वृध्द, कोरेगाव येथील ७५ वर्षीय पुरुष, धनगरवाडी (ता. सातारा) येथील ९१ वर्षांचा वृध्द यांचा मृत्यू झाला.

सोमवारी रात्री उशिरा आलेल्या माहितीनुसार जिल्हा रुग्णालयात केंजळ (ता. वाई) येथील ५४ वर्षीय महिला, कण्हेरखेड येथील ५५ वर्षीय महिला, खटाव तालुक्यातील गोरेगाव वांगीतील ६३ वर्षीय पुरुष, वडूजमधील ६९ वर्षीय वृध्द, सोनगाव येथील ६५ वर्षीय पुरुष, सांगली जिल्ह्यातील ७० वर्षीय वृध्द असे मिळून २२ कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसर