corona virus: 11 new corona infected patients in the district; Two died | corona virus : जिल्ह्यात ११ नवीन कोरोना बाधित रुग्ण ; दोन जणांचा मृत्यू

corona virus : जिल्ह्यात ११ नवीन कोरोना बाधित रुग्ण ; दोन जणांचा मृत्यू

ठळक मुद्देजिल्ह्यात ११ नवीन कोरोना बाधित रुग्ण दोन बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू

सातारा : कोरोना बाधितांच्या आज सकाळी आलेल्या अहवालानुसार आणखी जिल्ह्यातील आणखी ११ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामध्ये दोन निकट सहवासित, ३ जण प्रवास करून आलेले तर सारीचे ५ रुग्ण आहेत. तर एका आरोग्य कर्मचाऱ्याचाही समावेश आहे. माण तालुक्यातील कन्नडवाडी आणि सातारा तालुक्यातील जिहे येथील बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

कोरोना बाधित रुग्णांमध्ये सातारा तालुक्यातील फडतरवाडी येथील २३ वर्षीय पुरुष, धनगरवाडी, कोडोली येथील ४८ वर्षीय पुरुष, करंडी येथील ५९ वर्षीय पुरुष, कारंडवाडी येथील ३० वर्षीय पुरुष, क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील ४२ वर्षीय पुरुष आरोग्य कर्मचारी यांचा समावेश आहे.

जावळी तालुक्यतील कुसुंबी येथील ३५ वर्षीय पुरुष. कोरेगाव येथील सुभाषनगर मधील ७५ वर्षीय पुरुष. खंडाळा तालुक्यातील लोणंद येथील ४२ वर्षीय पुरुष, शिरवळ येथील ६० वर्षीय पुरुष, पारगाव येथील ५० वर्षीय पुरुष. फलटण येथील ३४ वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.

दोन बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे रात्री उशिरा कन्नडवाडी ता. माण येथील ७५ वर्षीय पुरुष व जिहे ता. सातारा येथील ५८ वर्षीय पुरुष या दोन कारोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशीही माहिती डॉ. गडीकर यांनी दिली आहे.

Web Title: corona virus: 11 new corona infected patients in the district; Two died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.