शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

Corona Vaccination : साताऱ्यात 'रेकॉर्ड ब्रेक'; एकाच दिवशी ४२ हजार नागरिकांचं लसीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2021 12:43 IST

Corona Vaccination in Satara : एका दिवसात जिल्ह्यात २६२ लसीकरण सत्रामधून तब्बल ४२३१८ लोकांना लसीकरण करण्यात आले. आतापर्यंतचा हा एक विक्रम ठरला आहे.

सातारा - जिल्ह्यात कोरोना लसीकरण मोहीम वेगाने आणि पूर्ण क्षमतेने सुरू आहे.  लस उपलब्ध झाल्यानंतर समन्याय पद्धतीने वाटप केले जात आहे. शनिवारी एका दिवसात जिल्ह्यात २६२ लसीकरण सत्रामधून तब्बल ४२३१८ लोकांना लसीकरण करण्यात आले. आतापर्यंतचा हा एक विक्रम ठरला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ८ लाखांवर नागरिकांना लसीचा पहिला डोस मिळाला आहे. 

जिल्ह्यात जानेवारी महिन्यापासून कोरोना लसीकरणाला प्रारंभ झाला आहे. सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्सना लस देण्यात आली. त्यानंतर ६० वर्षांवरील ज्येष्ठ आणि ४५ ते ५९ वर्षांतील कोमॉर्बिड नागरिकांना कोरोना लसीचा डोस देण्यास सुरुवात झाली. दुसऱ्या टप्प्यात ४५ वर्षांवरील सर्वांनाच लस मिळू लागली. त्यासाठी शासकीय आरोग्य केंद्रे आणि खासगी काही रुग्णालयात ही सुविधा सुरु झाली. तर शासकीय केंद्रात मोफत लस देण्यात येत आहे. 

सद्यस्थितीत १८ वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी लसीकरण सुरू आहे. खासगी तसेच शासकीय रुग्णालयात ही सुविधा आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ८ लाखांवर नागरिकांना लसीचा पहिला डोस मिळाला आहे. शनिवारी तर तब्बल ४२ हजारांवर नागरिकांना लस देण्यात आली. हा एका दिवसातील आतापर्यंतचा विक्रम ठरला. यापूर्वी एका दिवसात ३८ हजार नागरिकांना कोरीना लस  दिली होती.   

शनिवारी लस घेतलेल्यामध्ये आरोग्य कर्मचारी ९२, आघाडीचे कर्मचारी २६४,१८ ते ४४ वयोगटातील २० हजार ६९७, ४५ ते ६० वयोगटातील १२२६१ आणि ६० वर्षाच्या पुढील ९००४ नागरिकांचा समावेश होता.  लस उपलब्ध होत आहे त्या पद्धतीने वाटप केले जात आहे. यासाठी आरोग्य विभाग तसेच इतर कर्मचारी काटेकोर नियोजन करीत आहेत. तसेच लसीकरण करून घेण्यासाठी नागरिकांमध्ये प्रबोधन केले जात आहे. 

लसीकरणाबद्दलचे गैरसमज दूर करण्यावर देखील विविध पातळ्यांवर भर दिला जात आहे. जवळपास सर्वत्र लसीकरणाला योग्य प्रतिसाद मिळत आहे. पण,  ज्या ठिकाणी कमी प्रतिसाद आहे. तेथे घरोघरी प्रबोधन करण्यावर भर दिला जात आहे. आशा सेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक, प्राथमिक शिक्षक, वैद्यकीय अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांच्यापासून ते गटविकास अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार, प्रांताधिकारी अशा सर्वच स्तरातील कर्मचारी व अधिकारी यासाठी कष्ट घेत आहेत.

जिल्ह्यात कोरोना लसीकरण मोहीम वेगाने सुरू आहे. यासाठी आरोग्य विभाग तसेच इतर अधिकारी आणि कर्मचारी यांच्या प्रयत्नातून मोहीम यशस्वी ठरत आहे. शनिवारी एका दिवसात ४२ हजार नागरिकांना लस देण्यात आली. आतापर्यंतचा हा विक्रम ठरला आहे. यापुढेही नागरिकांनी असाच प्रतिसाद लसीकरणाला द्यावा. तसेच सामाजिक अंतर पाळणे, मास्क लावणे, वारंवार हात धुणे या त्रिसूत्रीचा सातत्याने अवलंब करावा. 

- विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसरMaharashtraमहाराष्ट्रCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस