corona in satara-कोरोना झाल्याचा मेसेज पाठवून बदनामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 19:19 IST2020-03-26T19:17:39+5:302020-03-26T19:19:06+5:30
कोरोना नसताही एका व्यक्तीला कोरोना झाला आहे, असा मेसेज सोशल मीडियावर पाठवून बदनामी केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल झाला आहे.

corona in satara-कोरोना झाल्याचा मेसेज पाठवून बदनामी
ठळक मुद्देकोरोना झाल्याचा मेसेज पाठवून बदनामीशाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार
सातारा : कोरोना नसताही एका व्यक्तीला कोरोना झाला आहे, असा मेसेज सोशल मीडियावर पाठवून बदनामी केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल झाला आहे.
बाबा घाडगे (रा. बाबर कॉलनी, करंजे पेठ, सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, घाडगे याने एका व्यक्तीचे नाव घेऊन संबंधिताला कोरोना झाला आहे, असा मेसेज एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर पाठविला.
हा मेसेज संबंधित व्यक्तीच्या निदर्शनास आल्यानंतर त्याने शाहूपुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन अफवा आणि बदनामी केल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी बाबा घाडगेवर गुन्हा दाखल केला आहे.