'त्या' ओमायक्रॉन बाधितांचे आई-वडील कोरोना पॉझिटिव्ह, फलटण तालुक्यात खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2021 03:58 PM2021-12-22T15:58:06+5:302021-12-22T16:04:33+5:30

बाधित ज्या अपार्टमेंटमध्ये राहत होते त्यातील सर्व लोकांचे तसेच त्यांच्या आई-वडिलांची असे मिळून ३६ जणांची कोरोना चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये 34 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून दोन जणांना कोरोनाची लागण झाली आहे. 

Corona report of parents of Omaicron infected patient is positive Excitement in Phaltan taluka | 'त्या' ओमायक्रॉन बाधितांचे आई-वडील कोरोना पॉझिटिव्ह, फलटण तालुक्यात खळबळ

'त्या' ओमायक्रॉन बाधितांचे आई-वडील कोरोना पॉझिटिव्ह, फलटण तालुक्यात खळबळ

Next

फलटण : दक्षिण आफ्रिकेतील युगांडाहून आलेले तिघे जण ओमायक्रॉन बाधित सापडले असताना त्यांच्या संपर्कातील दोघे जण कोरोना बाधित झाल्याने फलटण तालुक्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे. हे दोघे ओमायक्रॉन बाधितांचे आई-वडील असून त्यांचा ओमायक्रॉन अहवाल येणे बाकी आहेत.

फलटण शहरांमध्ये आफ्रिकेतील युगांडा होऊन आलेले एकाच कुटुंबातील चौघे जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यातील तिघांना ओमायक्रॉनची लागण झाली होती. बाधित ज्या अपार्टमेंटमध्ये राहत होते त्यातील सर्व लोकांचे तसेच त्यांच्या आई-वडिलांची असे मिळून ३६ जणांची कोरोना चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये ३४ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून दोन जणांना कोरोनाची लागण झाली आहे. 

बाधितांचे हे दोघे आई वडील असून प्रशासनाने त्यांच्या ओमायक्रॉनच्या टेस्टसाठी नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविले आहेत. या दोघांच्या संपर्कात लोकांचा प्रशासनान युद्धपातळीवर शोध घेत आहे.

युगांडाहून चौघे ज्यावेळी फलटणला आले, त्यावेळी त्यांचे आई वडील दुसरीकडे राहायला गेले होते. चौघे बाधित येऊन त्यांना उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आल्यावर त्यांचे आई वडील पुन्हा त्याठिकाणी राहायला आले होते. ते कसे पॉझीटीव्ह आले याबाबतचा तपास प्रशासन करत आहे.

Web Title: Corona report of parents of Omaicron infected patient is positive Excitement in Phaltan taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.