शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

Corona Cases In Satara : कागदावर काम नको गावागावात पोहचवा : मकरंद पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2021 18:05 IST

Corona Cases In Satara : खंडाळा तालुक्यात कोरोनाचा प्रसार वाढत गेला पण लोकांना योग्य उपचार देण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न केले. मात्र जिल्ह्यात सर्वत्र कोरोनाची आकडेवारी कमी येत असताना खंडाळा तालुक्याचा आकडा का कमी होत नाही ही मोठी खंत आहे . कोरोनाला आळा घालण्यासाठी प्रशासनाने केवळ कागदावर काम न करता प्रत्यक्ष गावागावात पोहचून गावात येणाऱ्या अडचणी सोडविल्या पाहिजेत, अशा सूचना आमदार मकरंद पाटील यांनी केल्या.

ठळक मुद्देकागदावर काम नको गावागावात पोहचवा : मकरंद पाटीलखंडाळा तहसील कार्यालयात कोरोना आढावा बैठक

खंडाळा : खंडाळा तालुक्यात कोरोनाचा प्रसार वाढत गेला पण लोकांना योग्य उपचार देण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न केले. मात्र जिल्ह्यात सर्वत्र कोरोनाची आकडेवारी कमी येत असताना खंडाळा तालुक्याचा आकडा का कमी होत नाही ही मोठी खंत आहे . कोरोनाला आळा घालण्यासाठी प्रशासनाने केवळ कागदावर काम न करता प्रत्यक्ष गावागावात पोहचून गावात येणाऱ्या अडचणी सोडविल्या पाहिजेत, अशा सूचना आमदार मकरंद पाटील यांनी केल्या.आ. पाटील म्हणाले, खंडाळा तहसील कार्यालयात तालुक्याच्या कोरोनाबाबत सद्य स्थितीची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, सभापती राजेंद्र तांबे, जिल्हा परिषद सदस्य मनोज पवार, औद्योगिक सेलचे जिल्हाध्यक्ष बंडू ढमाळ , तहसीलदार दशरथ काळे, गटविकास अधिकारी माणिकराव बिचकुले, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश पाटील, डॉ. रवींद्र कोरडे, मुख्याधिकारी परदेशी यांसह अधिकारी उपस्थित होते .तालुक्यातील शिरवळ, लोणंद, शिंदेवाडी यांसह काही गावातून कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली नाही. तालुक्यातील पॉझिटिव्ह दर कमी होत नाही हे दुर्दैव आहे. रुग्णांची संख्या कमी होण्यासाठी प्रशासनाने दक्ष राहून काम करायला हवे. लोकांच्या आरोग्याबाबत दुर्लक्ष केल्यास खपवून घेतले जाणार नाही . प्रत्येक गावात सुरु केलेल्या विलगीकरण कक्षाकडे काटेकोरपणे लक्ष ठेवा.

आगामी काळात तिसरी लाट येण्याची शक्यता असून त्यामध्ये लहान मुलांना प्रादुर्भाव होऊ शकतो असे तज्ज्ञांचे मत आहे . त्यामुळे त्यांची काळजी घेण्यासाठी वैद्यकीय सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहोत मात्र त्यासाठी प्रशासनाने झोकून देऊन काम करायला हवे.पोलीस प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्षरवळमध्ये कोरोना काळात गटविकास अधिकारी यांनी ग्राम समितीची एकही बैठक घेतली नाही. त्यांचे ग्रामसेवक काय काम करतात याची माहिती पदाधिकाऱ्यांना दिली जात नाही. शिरवळच्या कोरोना प्रसाराला पोलीस यंत्रणाही कारणीभूत आहे. त्यांची कामात टाळाटाळ असते. कंपनी कामगारांची चोख तपासणी करण्यात यंत्रणा फोल ठरली आहे असे ताशेरे जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले यांनी ओढले. याबाबत योग्य ती कार्यवाही करून खबरदारी घेण्याच्या सूचना आमदार मकरंद पाटील यांनी दिल्या.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसरMakrand Patilमकरंद पाटील