शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

चोरटे घुसले भुयारात; जमिनीतील पाच लाखांची कॉपर वायर लंपास, कऱ्हाडातील घटना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2024 12:08 IST

दूरध्वनी सेवा विस्कळीत झाल्याने प्रकार उघड

कऱ्हाड : दूरध्वनी सेवेसाठी जमिनीखालून पुरून नेलेली सुमारे पाच लाख रुपयांची कॉपर वायर चोरट्यांनी लंपास केली. कऱ्हाडातील बसस्थानक ते उपजिल्हा रुग्णालयादरम्यान ही घटना घडली. याबाबत बीएसएनएल कंपनीचे उपमंडल अभियंता शशिकांत अण्णा माळी यांनी कऱ्हाड शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.कऱ्हाडच्या बीएसएनएल कार्यालयात शशिकांत माळी हे उपमंडल अभियंता म्हणून कार्यरत आहेत. २०१८ साली बीएसएनएल कंपनीने ग्राहकांच्या दूरध्वनी जोडणीसाठी शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी जमिनीच्या खालून तांबे धातूच्या केबल टाकल्या आहेत. ही केबल लाईन जमिनीखाली सहा फूट असून, प्रत्येकी दोनशे मीटर अंतरावर त्याचे चेंबर आहेत. या चेंबरला गोलाकार सिमेंटचे झाकण असून ते झाकण काढून चेंबरमध्ये उतरून केबलपर्यंत पोहोचता येते.शहरातील दैत्यनिवारणी मंदिर येथील दूरध्वनी कार्यालयापासून कृष्णा नाक्यावरील एरम हॉस्पिटलपर्यंत ही लाईन टाकण्यात आली आहे.काही दिवसांपूर्वी बसस्थानक ते उपजिल्हा रुग्णालय परिसरातील ग्राहकांनी त्यांचे दूरध्वनी बंद असल्याबाबत बीएसएनएल कार्यालयाकडे तक्रार केली. त्यानुसार उपमंडल अभियंता शशिकांत माळी यांच्यासह कर्माचाऱ्यांनी त्याठिकाणी जाऊन पाहिले असता बसस्थानकापासून उपजिल्हा रुग्णालयापर्यंत जमिनीखालून असलेली केबल त्यांना दिसली नाही. कामानिमित्त वरिष्ठ बीएसएनएल कार्यालयामार्फत ही केबल काढण्यात आली असावी, असा समज झाल्याने उपमंडल अभियंता माळी यांनी याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडे चौकशी केली. मात्र, त्या परिसरात कोणतेही काम करण्यात आले नसल्याचे वरिष्ठांकडून सांगण्यात आले. त्यामुळे माळी यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता चोरट्यांनी चेंबरमध्ये उतरून जमिनीखालून पुरून नेलेली १ हजार २०० पिअरची, २०० मीटर लांब व पाच इंच व्यास असलेली ४ लाख ८० हजार रुपये किमतीची कॉपर वायर चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीस आले. याबाबत शशिकांत माळी यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हवालदार रूपाली कांबळे तपास करीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKaradकराडtheftचोरीPoliceपोलिस