शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

कूपरचे अग्निशमन दल ठरतेय संकटमोचक ! सातारकरांची सुरक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 12:28 PM

सातारा शहर व सातारा औद्योगिक वसाहतीसाठी कूपर उद्योग समूहाची अग्निशामक सेवा वरदान ठरली आहे. आगीच्या तांडवावेळी स्वत:चा जीव धोक्यात घालून या सेवेतील कर्मचारी देवदूतासारखे तत्काळ धावून जातात

ठळक मुद्देजीव-वित्त वाचविण्यासाठी देवदूतांचा जीव धोक्यात

सागर गुजर । सातारा : सातारा शहर व सातारा औद्योगिक वसाहतीसाठी कूपर उद्योग समूहाची अग्निशामक सेवा वरदान ठरली आहे. आगीच्या तांडवावेळी स्वत:चा जीव धोक्यात घालून या सेवेतील कर्मचारी देवदूतासारखे तत्काळ धावून जातात आणि अनेकांचे जीव वाचवतात, बहुमूल्य मालमत्तेचेही रक्षण करतात. औद्योगिक वसाहतीसह संपूर्ण सातारा तालुक्यातील जनतेसाठी कूपरचे अग्निशमन दल संकटमोचक ठरलेय!

साताºयातील औद्योगिक परिसर आकाराने मोठा असला तरी आग प्रबंधक व अग्निशामन करणाºया सुविधांच्या बाबतीत जवळपास सर्वच औद्योगिक आस्थापनांमध्ये वानवा आहे. कितीतरी दिवसांपासून सातारा औद्योगिक वसाहतीमध्ये अग्निशामन केंद्राची मंजुरी झाली असली तरी शासनाच्या लाल फितीतून अजून तरी ती बाहेर पडलेली नाही. 

आगीच्या घटनेवेळी येथील उद्योजकांना प्रामुख्याने कूपर कार्पोरेशन अथवा सातारा नगरपालिकेच्या अग्निशामक दलावरच विसंबून राहावे लागते. कूपर कार्पोरेशन सुरक्षा विभागातील अग्निशामक दलातील दोन सुरक्षा अधिकारी, बंबाचे तीन चालक व चार अग्निशामक कर्मचारी दिवस असो किंवा रात्र, सुटी असो किंवा सण; संकटसमयी स्वत:चा जीव धोक्यात घालून आगीच्या ठिकाणी तत्परतेने धाव घेतात. अशा सेवेला शासनाच्या वतीने कुठलाच कायदेशीर आधार मिळत नाही. संकटसमयी केलेली मदत विसरू नयेकूपरच्या अग्निशामक दलात अजिंक्य स्वयंरोजगार सहकारी सेवा संस्था यांच्या वतीने पीयूष माने, राजाराम शिंदे व मधुकर माने हे अग्निशामक चालक तर यशवंत क्षीरसागर, हेमंत काळंगे, सागर पवार व पंकज साबळे हे अग्निशमन कर्मचारी म्हणून तिन्ही पाळीत काम करतात. उसाला लागलेल्या  आगी विझविल्याटॉप गिअर, यश इंडस्ट्रीज, परफेक्ट हाऊस, शहरातील मुथा, जुन्या औद्योगिक वसाहतीतील आकर्षण फर्निचर, जनरल रबर प्रॉडक्ट, नारायण मिल, रमेश साळुंखे डेकोरेटर्स आदी ठिकाणी लागलेली आग विझविली.  

आग आटोक्यात आणल्याने मोठे नुकसान टळते. त्याची जाणीव ठेवून पाच-पन्नास हजार रुपये बक्षीस जीव धोक्यात घालणाºया अग्निशामक कर्मचाºयांना मिळायला हवे.- सुनील इंगवले, कामगार संघटनेचे सचिव  

टॅग्स :Satara areaसातारा परिसर