Accident: पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर कंटेनरची एसटीला धडक; एसटीचे नुकसान
By दत्ता यादव | Updated: July 13, 2022 14:38 IST2022-07-13T14:37:21+5:302022-07-13T14:38:20+5:30
सुदैवाने एसटीतील प्रवाशी कोणीही जखमी झाले नाहीत.

Accident: पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर कंटेनरची एसटीला धडक; एसटीचे नुकसान
दत्ता यादव
सातारा : पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील वाढे फाट्यावर कंटेनरने एसटीला धडक दिल्याने एसटीचे मोठे नुकसान झाले. मात्र, सुदैवाने एसटीतील प्रवाशी कोणीही जखमी झाले नाहीत. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात कंटेनरचालकावर गुन्हा दाखल झाला आहे. हा अपघात काल, मंगळवारी झाला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, एसटीचालक विनय कृष्णाजी थोरात (वय ४५, रा. बलकवडे, ता. तासगाव, जि. सांगली) हे सांगलीहून पुण्याला एसटी घेऊन निघाले होते. ते वाढे फाट्यावर एसटी घेऊन आले असता कंटेनरने एसटीला पाठीमागून जोराची धडक दिली. यामध्ये एसटीचे काच फुटून उजव्या बाजूचे नुकसान झाले.
कंटेनरचालक अशपाक बशीर बकापूर (रा. हुबळी, जि. धारवाड, राज्य कर्नाटक) याने निष्काळजीपणे वाहन चालवून एसटीचे नुकसान केल्याप्रकरणी चालक बकापूर याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.