अर्णब गोस्वामीवर कारवाईसाठी काँग्रेस रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 04:19 AM2021-01-24T04:19:35+5:302021-01-24T04:19:35+5:30

सातारा : अर्णब गोस्वामी आपल्या चॅनलचा टीआरपी वाढविण्यासाठी देशाच्या सुरक्षेच्या बाबतीमधील माहितीचा वापर करत होता हे अत्यंत गंभीर असून ...

Congress on the streets for action against Arnab Goswami | अर्णब गोस्वामीवर कारवाईसाठी काँग्रेस रस्त्यावर

अर्णब गोस्वामीवर कारवाईसाठी काँग्रेस रस्त्यावर

Next

सातारा : अर्णब गोस्वामी आपल्या चॅनलचा टीआरपी वाढविण्यासाठी देशाच्या सुरक्षेच्या बाबतीमधील माहितीचा वापर करत होता हे अत्यंत गंभीर असून हा राष्ट्रद्रोहच आहे. या प्रकरणी अर्णब गोस्वामीला तत्काळ अटक करावी या मागणीसाठी सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने काँग्रेस कमिटीसमोर निदर्शने करण्यात आली.

अर्णब गोस्वामी आणि बार्कचे अधिकारी पार्थो दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सॲप चॅटमधून देशाच्या सुरक्षेसंबंधीची अत्यंत गोपनीय माहिती अर्णब गोस्वामीला मिळत होती. पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानातील बालाकोटवर भारताने हवाई हल्ला केला. ही कारवाई होण्याच्या तीन दिवस आधी याची माहिती अर्णब गोस्वामीला कशी मिळाली? त्याने अजून कोणाला ही माहिती दिली का? या प्रश्नांची उत्तरे मिळणे आवश्यक आहे. अर्णब गोस्वामी यांचे कृत्य हे कार्यालयीन गोपनीयतेचा भंग करणारे तर आहेच; पण हा देशद्रोहाचा प्रकार आहे. त्यामुळे अर्नब गोस्वामीविरोधात कारवाई करावी, या मागणीसाठी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने निदर्शने करण्यात आली.

यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, युवक जिल्हाध्यक्ष विराज शिंदे, महिला जिल्हाध्यक्ष धनश्री महाडिक, मनोज तपासे, धैर्यशील सुपले, प्रताप देशमुख, बाळासाहेब शिरसाट, वैशाली जाधव, अनवर पाशा खान, दत्तात्रय धनवडे, नरेश देसाई, प्रकाश फरांदे, जासमीन खान, गीता सूर्यवंशी, प्रकाश फरांदे, विठ्ठल फणसे, रमेश फणसे, अमित जाधव, अभय कारंडे, सादिक खान, मालन परकळर आदी उपस्थित होते.

फोटो ओळ : सातारा येथील काँग्रेस कमिटीसमोर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी निदर्शने केली. (छाया : जावेद खान)

Web Title: Congress on the streets for action against Arnab Goswami

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.