शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसने सुरू केली लोकसभा निवडणुकीची तयारी; निरीक्षक, आमदार भाई जगताप सातारा दौऱ्यावर

By नितीन काळेल | Updated: August 9, 2023 18:54 IST

विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा, येत्या शुक्रवारपासून सुरूवात 

सातारा : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रीय काँग्रेसने तयारी सुरू केली असून आता सातारा आणि माढा लोकसभा मतदारसंघात बैठका घेण्यात येणार आहेत. त्यातील सातारा मतदारसंघातील बैठक दि. ११ आणि १२ ऑगस्ट रोजी विधानसभा मतदारसंघ होणार असून निरीक्षक व आमदार भाई जगताप हे दोन दिवस जिल्ह्यात असणार आहेत. यातून काँग्रेस निवडणुकीची जोरदारी तयारी करत असल्याचेच स्पष्ट होत आहे.लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने स्थानिक पातळीवरील सध्याची राजकीय स्थिती काय आहे याची माहिती मिळण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा घेण्याची सूचना केली आहे. त्यानुसार सातारा लोकसभा मतदारसंघासाठी निरीक्षक म्हणून मुंबई प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि आमदार भाई जगताप यांची निवड केली आहे. तसेच माढा लोकसभा मतदारसंघासाठी माजी खासदार हुसेन दलवाई आणि प्रदेशचे उपाध्यक्ष मोहन जोशी निरीक्षक असणार आहेत. सातारा लोकसभा मतदारसंघातील बैठका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या मार्गदरशनाखाली आणि जिल्हा प्रभारी श्रीरंग चव्हाण-पाटील, सहप्रभारी निखिल कवीश्वर यांच्या उपस्थितीत होतील.या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डाॅ. सुरेश जाधव यांनी विधानसभा मतदारसंघातील तालुकाध्यक्ष, तसेच प्रदेश प्रतिनिधी, महिला आघाडी, जिल्हा आणि तालुका कार्यकारिणी, विविध सेल पदाधिकाऱ्यांनी निश्चित केलेल्या वेळेत उपस्थित रहावे, असे आवाहन केले आहे.सातारा लोकसभा मतदारसंघ आढावा बैठका...दि. ११ रोजी दुपारी दीडला कऱ्हाडमध्ये कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदारसंघाची बैठक होईल. त्यानंतर तीन वाजता पाटण आणि साडे चारला कऱ्हाड उत्तर मतदारसंघाची बैठक होणार आहे. त्याचबरोबर दि. १२ रोजी सातारा काॅंग्रेस कमिटीत सकाळी ११ ला सातारा विधानसभा मतदारसंघ, दुपारी १२ ला कोरेगाव आणि एक वाजता वाई विधानसभा मतदारसंघाची बैठक होणार आहे, अशी माहिती जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई यांनी दिली आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरcongressकाँग्रेसlok sabhaलोकसभाElectionनिवडणूकbhai jagtapअशोक जगताप