शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
2
Top Marathi News LIVE Updates: बारामती पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; पश्चिम बंगाल, तामिळनाडूतही मतदारराजा देणार कौल
3
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
4
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
5
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
6
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
7
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
8
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
9
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
10
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
11
महिला क्रिकेटरचा 'हनीट्रॅप' गेम! व्यावसायिकाला ६३ लाखांना लुटले, मुंबई पोलिसांनी श्रीनगरमधून उचलले
12
"रिद्धी खूप खूश झाली अन्..." राकेश बापटने सांगितली एक्स वाईफची कशी होती प्रतिक्रिया
13
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
14
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
15
‘पंतप्रधान मोदींना लक्ष्य करणे म्हणजे थेट १४० कोटी भारतीयांचा अपमान’, एकनाथ शिंदेंची खर्गेंवर टीका
16
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
17
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
18
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
19
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
20
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
Daily Top 2Weekly Top 5

सात मतदारसंघांत काँग्रेसची तयारी!

By admin | Updated: September 16, 2014 23:37 IST

इच्छुकांची यादी दिल्लीला : सातारा वगळता सर्व ठिकाणी ‘स्वबळाची चाचपणी’

सातारा : विधानसभेला जागा वाटपावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीत सुरू असलेला तिढा अजूनही कायम आहे. काँग्रेसने इच्छुकांची यादी केंद्रीय निवड समितीकडे पाठविली आहे. या यादीत सातारा वगळता उर्वरित सात मतदारसंघांत इच्छुक असणाऱ्या उमेदवारांची नावे आहेत.आघाडी झाली तरी पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेस जिल्हाध्यक्षांनी ‘मैत्रीपूर्ण लढती’ची मागणी केली आहे. जिल्ह्यात आठ मतदारसंघ असून, यापैकी सहा मतदारसंघांत राष्ट्रवादी, तर दोन मतदारसंघांत काँग्रेसचे आमदार आहेत. ‘कऱ्हाड दक्षिण’चे आमदार विलासराव पाटील-उंडाळकर असले तरी येथून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव केंद्रीय निवड समितीकडे पाठविले आहे. माणचे आमदार असलेले जयकुमार गोरे निवडून आल्यानंतर पाच वर्षांनी काँग्रेसवासी झाले. त्यांचेच नाव दिल्लीला पाठविले आहे. फलटण मतदारसंघ राखीव आहे. येथून माजी खा. हिंदुराव नाईक-निंबाळकर गटाचे दिगंबर आगवणे यांचे नाव दिल्लीला पाठविले जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र, त्यांनी खा. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील ‘स्वाभिमानीे’त प्रवेश केल्यामुळे काँग्रेसची अडचण झाली. परिणामी काँग्रेसने येथून माजी समाजकल्याण समिती सभापती बाळासाहेब शिरसाट यांचे नाव दिले. (प्रतिनिधी)दिल्लीला पाठविलेली नावेकऱ्हाड दक्षिण : पृथ्वीराज चव्हाण कऱ्हाड उत्तर : धैर्यशील कदम पाटण : हिंदुराव पाटील वाई : मदन भोसले माण : जयकुमार गोरे कोरेगाव : किरण बर्गे, विजय कणसे फलटण : बाळासाहेब शिरसाटराष्ट्रवादीचे चार उमेदवार निश्चितराष्ट्रवादी काँग्रेसने चार मतदारसंघांतील उमेदवारांची नावे अंतिम केली आहेत. यामध्ये शशिकांत शिंदे (कोरेगाव), शिवेंद्रसिंहराजे भोसले (सातारा), बाळासाहेब पाटील (कऱ्हाड उत्तर), मकरंद पाटील (वाई) यांचा समावेश आहे.साताऱ्यात उमेदवाराचा शोधसातारा-जावळी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून माजी आमदार सदाशिव सपकाळ इच्छुक होते. मात्र, त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे त्यांचा पत्ता कट झाला. दरम्यान, आघाडी नाहीच झाली आणि काँग्रेस, राष्ट्रवादी स्वबळावर लढले तर साताऱ्यातून काँग्रेसकडे तुल्यबळ उमेदवार नाही. त्यामुळे अशा उमेदवाराचा शोध असल्याची माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार आनंदराव पाटील यांनी दिली.