शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
3
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
6
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
7
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
8
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
9
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
10
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
11
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
12
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
13
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
14
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
15
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
16
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
17
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
18
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
19
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
20
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट

महाराष्ट्रात सध्या पेशवाईच नाही का? नाना पटोलेंचा आरोप; शिवशाही व पेशवाईतील योग्य निवड करण्याची वेळ

By प्रमोद सुकरे | Published: December 03, 2022 8:33 PM

पेशवाईने व शिवशाहीने नेमकं काय दिलं हे सर्वांना माहीत आहे.

प्रमोद सुकरे, लोकमत न्यूज नेटवर्क

कराड 

पेशवाई व शिवशाही या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. पेशवाईने व शिवशाहीने नेमकं काय दिलं हे सर्वांना माहीत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा तर पेशवाईने अनेकदा अपमान केला आहे; हा इतिहास आहे. आज पुन्हा त्या छत्रपतींच्या बद्दल अपमानास्पद वक्तव्य राज्यपाल व इतर काहीजण करीत आहेत. त्यामुळे ही पेशवाईच नाही का? याचा अभ्यास करण्याची तसेच शिवशाही व पेशवाई यांच्यातील एकाची निवड करण्याची वेळ आली आहे असे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी व्यक्त केले.

 कराड येथे शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधताना नाना पटोले बोलत होते. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

पटोले म्हणाले, महाराष्ट्राचे लचके तोडण्याचे काम गुजरात व कर्नाटक सरकारच्या माध्यमातून सध्या सुरू आहे. म्हणून तर कर्नाटकचे मुख्यमंत्री सोलापुरात कर्नाटक भवन बांधण्याची भाषा करीत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तर यापूर्वीच मी मोदी शहांचा हस्तक असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या आशीर्वादाने महाराष्ट्राचे तुकडे करण्याचा डाव सुरू आहे. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे हे होऊ देणार नाहीत. ईडी सरकारने महाराष्ट्रातील जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये.

भाजपचे केंद्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल ताळतंत्र सोडून वक्तव्य केली आहेत .प्रवक्त्याची  भूमिका ही पक्षाची भूमिका असते .मग महाराष्ट्रातील भाजप नेत्यांना ती भूमिका मान्य आहे का? याचे उत्तर त्यांनी द्यावे. मान्य नसेल तर त्याला विरोध करावा. नाहीतर पदाचा राजीनामा द्यावा असेही पटोले एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले.

तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात आला आहात काय सांगाल? असे विचारताच पटोले म्हणाले; संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश ज्यांनी आणला त्या दिवंगत यशवंतराव चव्हाण यांची ही कर्मभूमी आहे. यशवंतराव चव्हाण ते पृथ्वीराज चव्हाण असा याला इतिहास आहे. आज त्याच जिल्ह्यातील एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत हे खरे आहे पण, अलिकडच्या काळात ० ते१वयोगटातील सुमारे १० हजार मुलांचा  मृत्यू झालाय. त्यांना औषध मिळत नाही. मग हा पैसा जातो कुठे? हा माझा प्रश्न आहे. रोजगाराच्या संधी नाहीत; अतिवृष्टीतील शेतकऱ्यांना मदत मिळत नाही अन आता पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरीही आत्महत्या करू लागला आहे. या सगळ्या परिस्थितीत मी नेमकं काय बोलायचं?असा प्रश्न त्यांनी माध्यम प्रतिनिधींनाच केला.

लुटारुंना लुटण्याची संधी 

महाविकास आघाडी सरकारच्या काळात ज्या अजय आशर या व्यक्तीवर आशिष शेलार यांनी लुटारू म्हणून आक्षेप घेतला होता; आरोप केले होते, त्याच व्यक्तीची एकनाथ शिंदेंनी नुकतीच मैत्री आयोगाच्या उपाध्यक्षपदी निवड केली आहे. मग लुटारुला सामान्य लोकांचे पैसे लुटण्याची ही संधीच दिली नाही का? असा सवालही पटोले यांनी यावेळी केला.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेKaradकराड