शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

..त्यामुळे राहुल गांधी यांना महाराष्ट्राची जनता माफ करणार नाही - उदयनराजे भोसले 

By सचिन काकडे | Updated: November 7, 2024 17:27 IST

..तर भारताच्या लोकशाहीला धोका उद्भवू शकतो

सातारा : छत्रपती शिवराय हे युगपुरुष असून, त्यांनी खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये लोकशाहीचा पाया रचला. अशा युगपुरुषाविषयी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केलेली वक्तव्य अत्यंत निषेधार्थ आहेत. महाराष्ट्राची जनता त्यांना कदापि माफ करणार नाही. अशी माणसं लोकशाहीच्या प्रक्रियेत आली तर भारताच्या लोकशाहीला धोका उद्भवू शकतो, अशा शब्दांत खासदार उदयनराजे भोसले यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध केला.राहुल गांधी यांनी समाज माध्यमांवर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा उदयनराजे भोसले यांनी जलमंदिर या निवासस्थानी गुरुवारी दुपारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत समाचार घेतला. ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे युगपुरुष होते. त्यांनी लोकशाहीचा पाया रचला. सर्वधर्म समभाव ही शिकवण त्यांनी दिली. घरोघरी त्यांना दैवत म्हणून पूजले जाते. असे असताना भ्रमिष्ट व क्रियानिष्ठ असलेल्या राहुल गांधी यांनी शिवरायांबद्दल समाज माध्यमांवर मांडलेले मत अत्यंत निंदनीय आहे.

ज्यांना युगपुरुषांची कोणतेही माहिती नाही, स्वतःची विचारधारा नाही असा व्यक्ती एखाद्या पक्षाचे नेतृत्व कसे काय करू शकतो? अशा व्यक्तींना महाराष्ट्र व देशाच्या जनतेने धडा शिकवावा, कारण असाच पायंडा जर पुढे पडत गेला तर तो देशासाठी हितकारी ठरणार नाही. 

राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार करणारया संदर्भात संपूर्ण माहितीची तक्रार राज्य निवडणूक आयोगाकडे करणार आहोत. या वक्तव्याचा सर्व पातळीवर निषेध झाला पाहिजे. दरम्यान, महापुरुषांवर केल्या जाणाऱ्या आक्षेपार्ह वक्तव्यांबाबत कठोर कायदा करावा, अशी मागणी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करणार असल्याचे उदयनराजे यांनी सांगितले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४satara-acसाताराUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेRahul Gandhiराहुल गांधीwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024