शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यानंतर साताऱ्यातही काँग्रेसला धक्का बसणार, मोठा नेता 'राष्ट्रवादी'च्या वाटेवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 12:49 IST

'घड्याळा'तील  कोणते अचूक टाइमिंग शोधलेय

प्रमोद सुकरेकऱ्हाड: राजकारणात कोण कोणाचा कायमचा शत्रू अथवा मित्र नसतो असे सांगितले जाते. पण आपल्या वडिलांच्या मित्रांच्या ऋणानुबंधाची जाणीव ठेवत त्यांच्या मुलाच्या राजकीय वाटचालीत 'मदत व पुनर्वसना'साठी वाई- खंडाळ्याचे दोन बंधू नेते सरसावल्याचे समोर आले आहे. त्याचाच भाग म्हणून सातारा जिल्ह्यातील काँग्रेसचा एक मोठा नेता, प्रदेश काँग्रेसचा पदाधिकारी आता राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचे खात्रीशीर मानले जात आहे. येत्या महिनाभरात त्यांचा पक्षप्रवेश झाला तर नवल वाटायला नको.

एकेकाळी सातारा जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर तो राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाऊ लागला. आता मात्र या जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती पूर्णता बदलली आहे. नाही म्हटलं तरी त्याची सल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मनात कायम आहे. म्हणूनच सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस बळकट करण्यावर त्यांचे लक्ष दिसत आहे. त्याचाच भाग म्हणून अजित पवारांनी 'या' काँग्रेसच्या नेत्याला थेट ऑफर दिली असून वाई- खंडाळ्याच्या दोन नेते बंधूनी यासाठी पायघड्या घातल्याचे बोलले जातेय.

स्वातंत्र्य सैनिकांची पार्श्वभूमी असणारे ,अनेक वर्ष काँग्रेसचा वारसा जोपासणारे घराणे म्हणून माजी मंत्री विलासराव पाटील- उंडाळकर यांच्या घराण्याची ओळख आहे. मात्र सत्ते शिवाय कार्यकर्ते थांबत नाहीत, लोकांच्या दारात जाण्यापूरती तरी सत्ता असली पाहिजे हे ओळखून त्यांचे वारसदार अँड. उदयसिंह पाटील हा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत.

पण हा निर्णय घेत असताना 'रयत' संघटना आपल्याबरोबर असणे गरजेचे आहे हे लक्षात घेऊन नुकताच त्यांनी प्रमुख कार्यकर्त्यांचा एक मेळावा घेतला.त्यात कार्यकर्त्यांची मनेही जाणून घेतली. त्यांना चांगला प्रतिसाद मिळाल्याचे समजते. त्यामुळे आता अजून एक विस्तृत मेळावा घेऊन आपण आपला निर्णय ठरवू असा सावध पवित्रा त्यांनी घेतला आहे. त्यामुळे नजीकच्या काळात या बाबतीत घडामोडी अधिक गतिमान होताना दिसतील.अन अंतिम निर्णय काय होतोय हे पहाण्यासाठी थोडे थांबावे लागेल.

'घड्याळा'तील  कोणते अचूक टाइमिंग शोधलेयखरंतर लोकसभा निवडणुकी पूर्वीपासूनच अजित पवारांच्या राष्ट्रवादीने 'उदयसिहां'ना गळ टाकला आहे. आजवर त्या दोघांच्यात ३ बैठकाही झालेल्या आहेत. पण त्याला मूहूर्त स्वरूप आले नाही. आता मात्र उदयसिंहानी राष्ट्रवादीच्या 'घड्याळा'तील नेमके कोणते अचूक टाइमिंग शोधले आहे ? हे नजीकच्या काळात समोर येईलच.

काय शब्द दिलाय?उपमुख्यमंत्री अजित पवार व उदयसिंह पाटील यांच्यात झालेल्या बैठकीत पवारांनी पाटलांना शब्द दिल्याचे सांगितले जाते. पण नेमका काय शब्द दिलाय हे समोर येत नाही. उचित सन्मान करण्याचा शब्द दिल्याचे कार्यकर्ते बोलतात अन अजित पवार दिलेला शब्द पाळणारा नेता आहे अशीही कार्यकर्त्यांच्या चर्चा आहे बरं.

'सह्याद्री'वर बैठकदोन दिवसापूर्वी देखील राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील यांनी पुढाकार घेत उपमुख्यमंत्री अजित पवार व अँड. उदयसिंह पाटील यांच्यात 'सह्याद्री'वर बैठक घडवून आणली. या बैठकीतील तपशील यथावकाश समोर येईलच.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवार