Conduct National Legal Service Day Week from tomorrow | साताऱ्यात उद्यापापासून राष्ट्रीय विधी सेवा द्विप्ताहाचे आयोजन
साताऱ्यात उद्यापापासून राष्ट्रीय विधी सेवा द्विप्ताहाचे आयोजन

ठळक मुद्देसाताऱ्यात उद्यापापासून राष्ट्रीय विधी सेवा द्विप्ताहाचे आयोजनन्यायाधीश कुंभोजकर ; गांधी मैदानावरून रॅली

सातारा : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय मुंबई यांच्या निदेर्शानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत राष्ट्रीय विधी सेवा दिन जिल्हा व तालुकास्तरावर दि.९ ते २३ नोव्हेंबर या कलावधीत द्विप्ताह साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रवीण कुंभोजकर यांनी दिली.

यावेळी न्यायाधीश निकम, सातारा बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. अरूण खोत, उपाध्यक्ष अ‍ॅड. संग्राम मुंडेकर उपस्थित होते.

राजवाड्यावरील गांधी मैदानापासून ९ नोव्हेंबर रोजी सकाळी जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले असून या रॅलीमध्ये विधीज्ञ, न्यायालयीन कर्मचारी, विधी स्वयंसेवक, शालेय विद्यार्थ्यांचा समावेश असणार आहे.

कायदे विषयक जनजागृती व्हावी, यासाठी जागर पथनाट्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हे पथनाट्य पंचायत समिती, तहसील कार्यालय, एसटी बसस्थानक, सातारा कौटुंबिक न्यायालय इमारत येथे तसेच गर्दीच्या ठिकाणी जकातवाडी व करंजे, सातारा येथेही होणार आहे.

सोनगाव, माहुली, महागाव, प्रतापसिंह नगर, बसाप्पा पेठ, लक्ष्मी टेकडी, सैदापूर व म्हसवे येथील प्रत्येक घरात जाऊन कायदे विषयक असणारे माहितीपत्रके, बुकलेट, पॅम्प्लेटचे वाटप करण्यात येणार आहेत.

१६ नोव्हेंबर रोजी महिलांसाठी विधी साक्षरता शिबीराचेही आयोजन करण्यात आले आहे. सातारा तालुक्यातील पोलीस स्टेशनमध्ये विधी सेवा केंद्र सुरु करण्यात येणार असून ही केंद्रे आठवड्यातून तीन दिवस कार्यरत राहणार आहेत.

बाल लैंगिक अत्याचार कायद्याची जन जागृती व्हावी यासाठी पहिल्या टप्प्यामध्ये सातारा तालुक्यातील सर्व माध्यमिक व पूर्व माध्यमिक शाळांमध्ये १०० सत्रांमध्ये शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी आठ महिला विधिज्ञांची नियुक्ती करण्यात आली आहे. असे

मनोधैर्यावर २२ लाखांचे वाटप..

अत्याचाराच्या गुन्ह्यात पीडित असलेल्या महिलांचे, मुलींचे मनोधैर्य वाढून त्यांनी अन्यायाविरोधात पुढे यावे यासाठी शासनाने ह्यमनोधैर्यह्ण ही योजना आणली. त्या योजेनअंतर्गत जिल्ह्यात ७६ पीडितांना २२ लाख रुपयांचे वाटप करण्यात आल्याची माहिती न्यायाधीश कुंभोजकर यांनी यावेळी दिली.

Web Title: Conduct National Legal Service Day Week from tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.