भावानेच घरात चोरी केल्याची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 10:41 IST2019-12-20T10:40:53+5:302019-12-20T10:41:26+5:30

शिवथर (ता.सातारा) येथून बंद घरातून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा २० हजारांचा ऐवज चोरीस गेला. याप्रकरणी प्रशांत मधुकर पवार (रा. शिवथर,ता. सातारा) याच्याविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Complaint of burglary at home | भावानेच घरात चोरी केल्याची तक्रार

भावानेच घरात चोरी केल्याची तक्रार

ठळक मुद्देभावानेच घरात चोरी केल्याची तक्रारसातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सातारा : शिवथर (ता.सातारा) येथून बंद घरातून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा २० हजारांचा ऐवज चोरीस गेला. याप्रकरणी प्रशांत मधुकर पवार (रा. शिवथर,ता. सातारा) याच्याविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, संदीप मधुकर पवार (रा. शिवथर,ता. सातारा) हे नोकरीनिमित्त गोडोली (सातारा) येथे वास्तव्यास आहेत. त्यामुळे त्यांचे घर बंद असते. याचाच फायदा घेत संशयित प्रशांत याने घराचे कुलुप तोडून पंधरा हजाराचा आर्धा तोळे वजनाचा नेकलेस व रोख रक्कम पाच हजार रुपये चोरून नेल्याचे पवार यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. पुढील तपास हवालदार राजू मुलाणी हे करत आहेत.

Web Title: Complaint of burglary at home