शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान कंपन्यांना दिलासा, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; एटीएफवरील व्हॅट १८% वरून थेट ७% वर!
2
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चेनंतरच आनंद परांजपेंचा पक्षप्रवेश; उदय सामंत यांचे स्पष्टीकरण
3
Top Marathi News LIVE Updates: अंबरनाथमध्ये मुख्य जलवाहिनीला मोठी गळती; लादी नाका परिसरात लाखो लीटर पाणी वाया
4
भारतीय जहाज दुर्घटनेनंतर जयशंकर यांचा परराष्ट्र मंत्र्यांशी थेट संवाद; दिला महत्त्वाचा सल्ला
5
मुलांच्या भविष्याची चिंता मिटली! 'PPF'च्या माध्यमातून शिक्षण आणि लग्नासाठी उभा करू शकता लाखोंचा फंड; जाणून घ्या नियम
6
भारताच्या शेजारील देशात नेमकी काय परिस्थिती? पेट्रोल-डिझेलचे दर पाहून चक्रावून जाल...
7
मोबाईल देणं पडलं महागात! अल्पवयीन मुलाने आईच्या खात्यातून शेजाऱ्याला पाठवले ३३ लाख अन् पुढे जे झालं.. 
8
IPL 2026 Playoffs Race : RCB सह GT चं तिकीट 'कन्फर्म'; उर्वरित २ जागांसाठी ६ संघांमध्ये चुरस
9
इराणची ‘मच्छर सेना’ अमेरिकेला ठरतेय भारी! का आहे इतकी खास?
10
NEET परीक्षेत मोठा बदल, पुढच्या वर्षापासून...; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र यांची मोठी घोषणा!
11
चमत्कारिक प्रसूती! महिलेनं ५ दिवसांच्या अंतरानं दिला ४ बाळांना जन्म, आईसह मुलेही सुखरूप
12
प्रेमासाठी लेकीनेच केला घात; प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी कोट्यधीश बापाच्या घरातच मुलीने टाकला दरोडा
13
महाराष्ट्रात सुरू होणार एसआयआर, मतदारांना काय करावं लागेल? जाणून घ्या!
14
हडपसर बॉम्ब प्रकरणात मोठी कारवाई; नागपूर रेल्वे स्टेशनवरून संशयित ताब्यात; आणखी किती जण रडारवर?
15
पहिले 'महामंदी' आता आणखी एक मोठा इशारा! रॉबर्ट कियोसाकी म्हणाले, "महागाई आणि कर्ज तुमची संपत्ती..."
16
युवराज सिंगच्या वडीलांविरोधात गुन्हा दाखल; महिलांबद्दल आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याचा आरोप!
17
Unnao Rape Case : कुलदीप सेंगरला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का! उच्च न्यायालयाचा 'तो' निर्णय रद्द; अडचणीत वाढ
18
मोहन जोशींनी स्वामींची भूमिका करण्यास दिलेला नकार; प्रवीण तरडेंचा खुलासा, म्हणाले- "त्यांना चालता-बोलता येत नव्हतं..."
19
स्वप्नपूर्ती! प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने मुंबईत घेतलं हक्काचं घर, शेअर केले सुंदर फोटो; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

सलून व्यवसाय करत बसविली समाजाची घडी!

By admin | Updated: April 26, 2016 00:27 IST

नाभिक समाज : शिक्षणामुळे अनेक जण विविध क्षेत्रांत कार्यरत; सामाजिक एकीतून आंदोलनांना मिळतेय ताकद

प्रदीप यादव --सातारा --दगाफटका होण्याची खात्री असतानाही जे प्रतिशिवाजी म्हणून सिद्धी जोहरच्या भेटीस गेले, ते वीर शिवा काशीद, प्रतापगडावर जिवाची बाजी लावणारा वीर जिवा महाले यांची नाव उच्चारताच आजही शिवरायांचा ज्वलंत इतिहास डोळ्यांसमोर उभा राहतो. नाभिक समाजातील असे शूरवीर आणि अनेक क्रांतिकारकांनी स्वराज्यासाठी, भारतभूमीसाठी प्राण पणाला लावले. रक्तातच लढण्याची जिद्द असलेल्या नाभिक समाजातील अनेक जण आज विविध क्षेत्रांत उच्च पदावर सेवा बजावत आहेत.
सातारा जिल्ह्यात नाभिक समाजाची लोकसंख्या ८० हजारांच्या जवळपास आहे. जिल्हाभर पसरलेला हा समाज एक व्हावा आणि समाजापुढील प्रश्न सोडविण्यासाठी वीर जिवाजी नाभिक समाज संघटनेची १९८० मध्ये स्थापना करण्यात आली. दिवंगत माजी पोलिस अधिकारी दत्तात्रय इंगळे, एकनाथराव साळुंखे, अच्युतराव जाधव, भाऊ दळवी यांच्या माध्यमातून संघटनेचे काम सुरू झाले. महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या मार्गदर्शनाखाली या संघटनेचे सातारा जिल्ह्यात काम सुरू आहे. सध्या जिल्हाध्यक्ष भानुदास वास्के, शहराध्यक्ष म्हणून लक्ष्मण जाधव हे काम पाहतात.
बारा बलुतेदारांपैकी एक असणारा हा नाभिक समाज. पूर्वांपार केस कर्तनाचा व्यवसाय करणारा हा समाज आज शैक्षणिक, सामाजिक, राजकीय अशा विविध क्षेत्रांत उच्च पदावर काम करत आहे. संघटनेच्या माध्यमातून हणमंतराव साळुंखे यांच्या प्रेरणेतून भाऊ दळवी, बापूराव काशीद, संतोष साळुंखे, चंद्रकांत पवार, सदाभाऊ सपकाळ, सुरेश पवार, आबासाहेब माने, एकनाथ शिर्के, अशोक सूर्यवंशी, बाळासाहेब काशीद, संपतराव पवार, बाळासाहेब पवार ही कार्यकर्त्यांची फळी समाजापुढील प्रश्न सोडविण्यासाठी कार्य करीत आहे.
वीर जिवाजी शिक्षणोत्तेजक संस्थेच्या माध्यमातून समाजातील गरीब, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक व आर्थिक मदत दिली जाते. प्राचार्य सुरेशराव गायकवाड हे याचे काम पाहतात. मुलांनी शिकावं, मोठं व्हावं आणि समाजोन्नतीसाठी कार्य करावं, हा यामागील उद्देश आहे.
सलग पाच वेळा विधानपरिषद सभापती राहिलेले शंकरराव जगताप, हणमंतराव साळुंखे यांनी कोल्हापूर येथे १९८१ मध्ये महाराष्ट्र नाभिक महामंडळाची स्थापना केली. या माध्यमातून शैक्षणिक, सामाजिक मेळावे घेऊन समाजजागृतीचे काम झाले. बलुतेदारी पद्धत बंद केली. सलून दुकानदारांना आर्थिक पाठबळ देऊन व्यवसायवृद्धीसाठी प्रयत्न करण्यात आले. अस्वच्छतेचा ठपका पुसून टाकला. सलून स्वच्छता डोळ्यात भरण्यासारखी दिसते, ती एकत्रित प्रयत्नांमुळे. नाभिक समाजानं कात टाकली असल्याचं चित्र दिसत आहे.

संघटनेसमोरील प्रश्न
वीर जिवाजी नाभिक समाज संघटनेच्या माध्यमातून विविध प्रश्नांवर सातारा जिल्ह्यात आंदोलने होत आहेत. यामध्ये सर्वात महत्त्वाची मागणी होती ती वीर जिवाजी महाले यांचे स्मारक प्रतापगडावर व्हावे. हा प्रश्न संघटनेच्या स्थापनेपासून म्हणजे १९८० पासून भिजत पडला आहे, असे संतोष साळुंखे यांनी सांगितले. त्यावर प्रशासकीय पातळीवर निर्णय होत आहेत. मात्र, अद्याप स्मारक उभे राहिले नाही. सलूनधारकांना सातारा बसस्थानकात स्टॉल मिळावा, नाभिक समाजाचा अनुसूचित जातीमध्ये समावेश करावा, व्यावसायिकांना पेन्शन योजना सुरू व्हावी, या प्रमुख मागण्यांसाठी संघटनेच्या माध्यमातून वारंवार आंदोलने छेडली जात आहेत.