देशोदेशीच्या टपाल तिकिटांचा संग्रह
By Admin | Updated: March 8, 2016 00:30 IST2016-03-07T22:12:42+5:302016-03-08T00:30:30+5:30
गीतांजली पाटील यांचा छंद : युद्धातील प्रसंगासह राज्याभिषेकाच्या प्रसंगांचा समावेश

देशोदेशीच्या टपाल तिकिटांचा संग्रह
कऱ्हाड : प्रत्येक व्यक्तीला एक छंद असतो. कोणी दुर्मीळ छायाचित्रे, शिवकालीन नाणी यांचा संग्रह करून ठेवतो. तर कुणी वेगवेगळी नाणी जमा करतो. कऱ्हाडातील गीतांजली पाटील यांनीही टपाल तिकीट व देशोदेशीची चलन संग्रहित करण्याचा छंद जपला आहे. विविध देशांतील नवे जुने पोस्टाची तिकिटे गीतांजली यांच्याकडे आहेत.
गीतांजली यांनी डच आणि मेक्सीकोने महात्मा गांधीच्या सन्मानार्थ काढलेले टपाल तिकीट, १९४२ चे छोडो भारत आंदोलन, विमानाने अवकाशात प्रथम झेप घेतलेला क्षण, यासह उटीची रेडिओ दुर्बीण, हंम्पींचा रथ, ‘आयएनएस’ विक्रांत युद्धनौका, आर्यभट्ट उपग्रह आणि दूरध्वनीचा जन्मदाता ग्र^हमबेल, रूझवेल्ट, अब्राहम लिंकन, संत नामदेव, महर्षी कर्वे, राजर्षी शाहू आदी देशविदेशातील मान्यवरांच्या सन्मानार्थ काढलेला भारतासह सुमारे पंचवीस देशातील आठशेहून दुुर्मीळ टपाल तिकिटांचा संग्रह केला आहे.
पाटील यांना घरातूनच मोठा राजकीय वारसा लाभला आहे. त्या दिवंगत दादासाहेब उंडाळकर यांच्या नातसून व जयसिंगराव पाटील यांच्या स्नूषा आहेत. त्यांचे पती अॅड. आनंदराव पाटील हे पंचायत समिती सदस्य आहेत. पाटील यांना स्वत:ला समाजकार्याची मोठी आवड आहे. गीतांजली यांच्या माहेरचे वातावरणही समाजसेवेचा वारसा जोपासणारे आहे.
गीतांजली यांच्याजवळ भारतासह अमेरिका, सिलोन(सध्याचा श्रीलंका), रुमानिया, आॅस्ट्रेलिया, जपान, कॅ^नडा, नेपाळ, सिंगापूर, कतार, पाकिस्तान, कुवेत, केनिया, नेदरलँड, न्यूझीलंड, नामिबिया, मंगोलिया, मेक्सिको, डच आदींसह पंचवीसहून अधिक देशातील टपाल तिकिटे आहेत.
संग्रहामध्ये लोकमान्य टिळकांचे दोन आण्यांचे सर्वात जुने तिकिट, पुण्याच्या फर्ग्युसन कॉ^लेजच्या शताब्दीनिमित्त काढलेल तिकीट, भूकंप इंजिनिअरांचे सहावे विश्वसंम्मेलन, कार्ल मार्क्स व दासक^ापिटल, रेडक्रॉस शताब्दी, परमवीर चक्र या सन्मान चिन्हांचे तिकीट, जोधपूर, वेलूर, किल्ला, राष्ट्रीय उद्यानाचा सुवर्ण महोत्सव, बारावी आंतरराष्ट्रीय मदा विज्ञान काँग्रेस, विश्व पुस्तक मेला, नागरी विमान सेवेची पन्नास वर्षे, महार रेजिमेंट, टेलिफोन सेवची शंभर वर्षे, नौसेना डाकयार्डची २५० वी जयंती, भगवान महावीरांची २५०० वी निर्वाण जयंती आदी उल्लेखनीय घटनांच्या सन्मानार्थ काढलेला तिकिटांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)
परदेशी मैत्रिणींकडूनही मिळविली तिकिटे
गीतांजली यांचे शिक्षण पुणे येथील सेंटमिरेज कान्व्हेंट येथे झाले. यावेळी त्यांच्या बरोबर अनेक परदेशी विद्यार्थिनी त्यांच्या मैत्रिणी होत्या. त्यांच्याकडून पाटील यांनी त्या-त्या देशातील टपाल तिकीट प्रयत्नपूर्वक मिळवून यासंग्रहात वाढ केली. पुढे सासरी येताना आवर्जून त्यांनी हा तिकिटांचा अनमोल खजिना सोबत आणला आणि सर्व प्रापंचिक व सामाजिकव्यापातून तो जतन करून वृंद्धीगत केला आहे. यापुढेही त्यामध्ये देशातील टपाल तिकिटांचा समावेश करण्याचा त्यांचा मानस आहे.
वि. दा. सावरकर, प्रेमचंद्र, हेलनकेलर, चार्ल्सडार्विन, लेनिन, जमान लाल बजाज, अहिल्याबाई होळकर, श्रीनिवास रामानूज, जगदीशचंद्र्र बोस, नेताजी बोस आदी दिग्गजांच्या सन्मानार्थ काढलेली तिकिटे विशेष उल्लेखनीय आहेत. तर फॅमिली प्लनिंगचे महत्त्व दर्शवणारे हम दो हमारे दो, प्राणी, पक्षी, विविध प्रकारची झाडे यांची दुर्मीळ चित्रे असणारी तिकिटे, कला संस्कृतीच दर्शन घडविणारी कथ्थक, ओडिसीन, राजस्थानी, हस्तशील्प, मध्ययुगीन मूर्ती कला आदी तिकीटे या संग्रहाचे महात्म्य आधोेरखित करतात.