एकनाथ शिंदेंनी केले बांबू मूल्यवर्धन केंद्राचे उद्घाटन; नाना पाटेकरही उपस्थित

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2024 04:06 PM2024-03-09T16:06:34+5:302024-03-09T16:12:29+5:30

जंगल भागातील शेतकरी महिला व युवकांना टरस रेशीम शेती नाविन्यपूर्ण शाश्वत उद्योग आहे.

CM Eknath Shinde inaugurated Bamboo Valuation Centre; Nana Patekar was also present | एकनाथ शिंदेंनी केले बांबू मूल्यवर्धन केंद्राचे उद्घाटन; नाना पाटेकरही उपस्थित

एकनाथ शिंदेंनी केले बांबू मूल्यवर्धन केंद्राचे उद्घाटन; नाना पाटेकरही उपस्थित

मौजे दरे (महाबळेश्वर) येथील बांबू मूल्यवर्धन केंद्राचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज झाले. तर टरस (वन्य) रेशीम शाश्वत रोजगार व संवर्धन प्रकल्पाचे लोकार्पण मुख्यमंत्री यांचे वडील संभाजी शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पालकमंत्री शंभूराजे देसाई, उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बांबू लागवडीस व रेशीम उत्पादन वाढीस प्रोत्साहन देण्यासाठी महाबळेश्वर तालुक्यातील मौजे दरे तर तांब येथे बांबू मूल्यवर्धन केंद्र आणि टसर रेशीम शाश्वत रोजगार व वनसंवर्धन प्रकल्प साकारण्यात आला आहे. शेतकरी, तसेच महिला व युवकांना कृषी व वनउपज उत्पादनासाठी पूरक रोजगार मोठी संधी उपलब्ध होणार आहे. 

जंगल भागातील शेतकरी महिला व युवकांना टरस रेशीम शेती नाविन्यपूर्ण शाश्वत उद्योग आहे. ऐन झाडाची लागवड रोजगार हमी योजनेतून करता येते. कुठेही नागरण करायचे नाही,पाण्याचे आवश्यकता नाही,औषध फवारणी नाही त्यामुळे सह्याद्री पर्वत रांगांमधील शेतकऱ्यांसाठी टरस रेशीम शेती एक वरदान ठरणार आहे असा विश्वास एकनाथ शिंदेंनी यावेळी व्यक्त केला.

Web Title: CM Eknath Shinde inaugurated Bamboo Valuation Centre; Nana Patekar was also present

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.