शेतकरी संकटात असताना मुख्यमंत्री कर्नाटकात प्रचाराला; अजित पवारांची एकनाथ शिंदेंवर टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2023 10:09 PM2023-05-08T22:09:55+5:302023-05-08T22:11:45+5:30

स्ट्रॉबेरी पाहून कधी शेती होते का, कधी झाडे बघायचे तर कधी आणखी काय, अशा शब्दांत अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांची खिल्ली उडवली.

cm busy campaigned in karnataka amid farmers woes ajit pawar attack on chief minister eknath shinde | शेतकरी संकटात असताना मुख्यमंत्री कर्नाटकात प्रचाराला; अजित पवारांची एकनाथ शिंदेंवर टीका

शेतकरी संकटात असताना मुख्यमंत्री कर्नाटकात प्रचाराला; अजित पवारांची एकनाथ शिंदेंवर टीका

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, सातारा: भाजपचे मंत्री नेते कर्नाटकात प्रचारात जातात, हे समजू शकते. पण केवळ ४० आमदारांचे गटाचे नेते असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्या पक्षाचे नसतानाही कर्नाटकात प्रचाराला जातात. त्यापेक्षा त्यांनी अवकाळीमुळे संकटात असलेल्या शेतकऱ्यांसाठी वेळ द्यावा, असा टोला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला. सातारा येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पवार म्हणाले, फळबागा आणि उन्हाळी पिके अवकाळी पावसामुळे वाया गेली आहेत. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. पंचनामे करुन महिना होऊन गेला तरी ही स्थिती आहे. मग, कर्नाटकात जाऊन काय सांगणार. दि. ३१ मार्चअखेर ठेकेदारांनी केलेल्या कामांची बिले सुद्धा अद्याप मिळाली नाही. राज्याची आर्थिक अवस्था बिकट आहे. राज्य शासनाचा प्रशासनावर प्रचंड दबाव आहे. कधीतरी शासकीय अधिकाऱ्याला विश्वासात घेऊन नक्की राज्य शासनाचे काय चालले आहे हे विचारा म्हणजे खरी परिस्थिती लक्षात येईल. कोरेगाव तालुक्यात येथील पोलिस ठाण्याला पोलिस निरीक्षक पद मंजूर असताना येथे यायला सुद्धा कोणी तयार नाही. यावरूनच दबावाचे राजकारण काय आहे हे लक्षात येते.

अनेकदा काय झालं की मुख्यमंत्री सातारा जिल्ह्यात गावी येऊन दोन-तीन दिवस राहतात. काय तर शेती करतोय. स्ट्रॉबेरी पाहून कधी शेती होती का, कधी झाडं बघायचे तर कधी आणखी काय, अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांची खिल्ली उडवली.

जागावाटपाबाबत एक फेरी पूर्ण

महाविकास आघाडी मजबूत आहे. जागा वाटपाच्या संदर्भात उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, एकनाथ खडसे, जयंत पाटील अशी चर्चेची एक फेरी झाली आहे. घटक पक्ष काँग्रेस सुद्धा आमच्याबरोबर आहे. या संदर्भात पुढील काळामध्ये त्यांच्याशीही वाटाघाटी केल्या जातील. कोणत्याही राजकीय स्थित्यंतराचा महाविकास आघाडीवर कोणताही परिणाम होत नाही.

अजित पवार काय म्हणाले, विकासकामांची जत्रा योजनेमध्ये पक्षाचा प्रचार कसा होईल हे जास्त पाहिले जातंय. कर्नाटक विधानसभा निवडणुकांत धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न आमदार अपात्रता निकालाला विलंबाबाबत सर्वांनाच कोडं

Web Title: cm busy campaigned in karnataka amid farmers woes ajit pawar attack on chief minister eknath shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.