शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

उरमोडीच्या पाण्यासाठी औंधसह सोळा गावांत बंद

By admin | Updated: August 17, 2014 00:21 IST

मोर्चा काढून निषेध : सांगलीला पाणी पळविल्याबद्दल संतप्त प्रतिक्रिया

औंध : औंधसह १६ गावांच्या शेती पाणीप्रश्नी शनिवारी गावे अधिक आक्रमक झाली. सांगली जिल्ह्यातील ढाणेवाडीसह ७ गावांना दिल्या जाणाऱ्या उरमोडीच्या पाण्याचा आदेश त्वरित रद्द करावा व शासनाच्या कृतीचा निषेध करण्यासाठी औंधसह १६ गावे बंद ठेवून मोर्चा काढून शनिवारी तीव्र निषेध करण्यात आला.सकाळी राजवैभव प्रतिष्ठानचे अध्यक्ष व पाणी संघर्ष चळवळीचे प्रणेते दत्तात्रय जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली औंध गावातून निषेध मोर्चा काढून ग्रामस्थ, युवक, शेतकऱ्यांनी निषेध केला.यावेळी ‘पाणी आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे’, कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही.’ ‘पाणी द्या, नाही तर चले जाव’ अशा घोषणांनी मोर्चा दणाणून गेला.हा निषेध मोर्चा बाजार पटांगण, बालविकास, हायस्कूल चौक, होळीचा टेक, केदार चौक, मारुती मंदिर मार्गे काढण्यात आला. यावेळी गावातील सर्व बाजारपेठा, आर्थिक व्यवहार, हॉटेल्स, दुकाने बंद ठेवून कडकडीत बंद पाळण्यात आला.त्यानंतर झालेल्या निषेध मोर्चात बोलताना दत्तात्रय जगदाळे म्हणाले की, ‘लोकप्रतिनिधींकडून या भागातील जनतेची फसवणूक होत असून लोकप्रतिनिधी वर विश्वास न ठेवता आता जनतेने ही लढाई हातात घेण्याची वेळ आली असून यापुढील काळात कितीही मोठा संघर्ष करावा लागला तरी तरुणाई व या भागातील जनता, शेतकऱ्यांनी संघटितपणे रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवावी. जिल्ह्याचे हक्काचे पाणी सांगलीकर पळवत असून ही जिल्ह्यातील दुष्काळी भागातील जनतेच्यादृष्टीने खेदाची बाब आहे.’यावेळी रामभाऊ घार्गे, नंदकुमार रणदिवे, धनाजी आमले यांनी ही आपली मनोगते व्यक्त केली.मोर्चा व निषेध सभेत पृथ्वीराज भोकरे, नंदकुमार रणदिवे, सागर जगदाळे, धनाजी आमले, जयसिंग घार्गे विजय हिंगे, दादा माळी, नामदेव भोसले, विनोद कदम, सागर चव्हाण, सागर गुरव, मच्छिंद्र सावंत, वसंतराव जानकर, गणेश चव्हाण, ग्रामस्थ, युवक, शेतकरी विविश युवा मंडळांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, परिसरातील १६ गावांतील व्यवहार पूर्णपणे बंद ठेवण्यात आले होते. ठिकठिकाणी बैठका घेऊन ग्रामस्थांनी याचा निषेध केला. उरमोडीचे पाणी सांगली जिल्ह्यास देण्याच्या शासनाच्या निर्णयाचे तीव्र पडसाद खटाव तालुक्यात उमटले. (वार्ताहर)