आजीसोबत खेळत असलेल्या 4 वर्षीय मुलाचे सिनेस्टाईल अपहरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2021 22:28 IST2021-02-17T22:27:42+5:302021-02-17T22:28:30+5:30
राजापेठ ठाणे हद्दीतील घटना, शोधार्थ चार पथक रवाना

आजीसोबत खेळत असलेल्या 4 वर्षीय मुलाचे सिनेस्टाईल अपहरण
अमरावती : घराजवळ आजीसोबत खेळत असलेल्या चार वर्षांच्या मुलाचे दुचाकीवर आलेल्या पुरुष व महिलेने सिनेस्टाईल अपहरण केल्याची धक्कादायक घटना राजापेठ ठाणे हद्दीत रात्री ७.४५ च्या सुमारास घडली. आरोपीच्या शोधार्थ राजापेठचे पोलीस पथक रवाना झाले आहे.
पोलीस सुत्रानुसार, चार वर्षीय मुलगा हा आजीसोबत घराशेजारीच खेळत होता. पण, अचानक दुचाकीवर बसलेला एक युवक व महिला तेथे पोहचले व त्याला दुचाकीवर आलेल्या दोघांनी मुलाला चालत्या वाहनावरून उचलून पळवून नेले. आजीने नातवाला वाचविण्याकरिता आरडाओरड केली. त्यानंतर तिने मुलाच्या आई-वडिलांना सांगितले. त्यांनी राजापेठ पोलिसांना घटनेची माहिती दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे, पोलीस निरीक्षक किशोर शेळके यांच्यासह पोलिसांचे पथक घटनास्थळावर दाखल झाले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलीस तपासात आहे. लहान मुलाचे अपहरण कुणी व कशासाठी केले, हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. चार वर्षीय मुलाचे वडील फळ व्यापारी आहेत, तर आई गृहिणी आहे.
परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येणार आहे. मुलाचे अपहरण का करण्यात आले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांचे पथक आरोपीच्या मागावर आहेत.
- आरती सिंह, पोलीस आयुक्त, अमरावती