खेळता खेळता शिडीवरून पडल्याने चिमुरडीचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 11:30 IST2021-04-08T11:25:54+5:302021-04-08T11:30:05+5:30
Accident Satara- खेळता खेळता शिडीवरुन जमिनीवर पडल्याने चिमुरडीचा मृत्यू झाला. येथील हौसाई कन्याशाळा परिसरात बुधवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

खेळता खेळता शिडीवरून पडल्याने चिमुरडीचा मृत्यू
मलकापूर : खेळता खेळता शिडीवरुन जमिनीवर पडल्याने चिमुरडीचा मृत्यू झाला. येथील हौसाई कन्याशाळा परिसरात बुधवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
आराध्या भास्कर चव्हाण (वय २ वर्ष, रा. हौसाई कन्या शाळेजवळ, मलकापूर) असे मृत्यू झालेल्या चिमुरडीचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहीतीनुसार, मलकापुरातील शास्त्रीनगर पश्चिम परिसरातील हौसाई कन्या शाळेजवळील पत्र्याच्या खोलीमध्ये चव्हाण कुटुंबीय राहतात. पत्र्याच्या खोलीला शिडी लावली होती. त्या शिडीवरून खेळताना आराध्याचा तोल जाऊन ती खाली पडली.
यामध्ये तिच्या डोक्याला जबर मार लागला. नातेवाईकांनी तिला उपचारासाठी त्वरित रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. घटनेची नोंद शहर पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास पोलीस हवालदार आर. एन. देशमुख करत आहेत.