किचनमध्ये दिलेली फोडणी उडली, अन् चिमणी पेटली; साताऱ्यातील राजपथवर घडली घटना
By प्रगती पाटील | Updated: April 24, 2023 17:09 IST2023-04-24T17:01:49+5:302023-04-24T17:09:39+5:30
अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी पाेहोचून आग आटोक्यात आणली

किचनमध्ये दिलेली फोडणी उडली, अन् चिमणी पेटली; साताऱ्यातील राजपथवर घडली घटना
सातारा : येथील राजपथावर असलेल्या राजपुरोहित स्वीटसच्या किचनमध्ये फोडणी चिमणीमध्ये उडली. चिमणीत तेलकट द्रव चिकटले असल्यामुळे चिमणीने पेट घेतला. या घटनेत वित्तीय हानी झाली असल्याची प्राथमिक माहिती आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, राजपुराेहित स्वीट्स या दुकानातील किचनमध्ये पदार्थ बनविण्याचे काम सुरू होते. यावेळी फोडणी घातल्यानंतर ती फोडणी चक्क चिमणीत अर्थात एक्झाॅस्ट फॅनमध्ये उडली. फोडणी तेलकट झालेल्या चिमणीवर उडल्याने तिने पेट घेतला. त्यातच भिंतीला लावलेल्या ऑइलपेंटनेही पेट घेतल्याने धुराचे लोट बाहेर पडू लागले.
आग लागल्यानंतर स्वयंपाकाच्या खोलीतून कामगार तातडीने पळत बाहेर आल्याने मोठा अनर्थ टळला. आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला दिल्यानंतर त्यांनी तातडीने पाेहोचून आग आटोक्यात आणली.