शहरं
Join us  
Trending Stories
1
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
2
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
3
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
4
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
5
"अभी तो मै जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
6
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
7
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
8
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
10
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
12
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
13
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
14
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
15
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
16
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
17
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
18
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
19
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
20
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
Daily Top 2Weekly Top 5

‘अज्ञात’ दंशाने मुले रुग्णालयात

By admin | Updated: September 20, 2014 00:33 IST

कांदाटीत घटना : शाळेतच मुलांच्या अंगाची आग; रक्ताचे नमुने पुण्याला

सातारा : महाबळेश्वर तालुक्यातील कांदाटी खोऱ्यातील एका शाळेतील नववीच्या दहा विद्यार्थ्यांना वर्गातच काहीतरी चावल्यामुळे त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुलांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले असून, त्याचा अहवाल आल्यानंतरच नेमका प्रकार समजू शकेल, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.प्रविणा तानाजी शेलार (वय १४), अंकिता रघुनाथ साळुंखे (१४), सीमा शंकर साळुंखे (१४), सुजाता सुभाष सावंत (१४, सर्व रा. आकलपे, ता. महाबळेश्वर), सीमा ईश्वर कदम (१४, रा. लाजम, ता. महाबळेश्वर), प्रज्योती प्रकाश शिंदे (१४, रा. उचाट, ता. महाबळेश्वर), शैलेश महादेव साळुंखे (१४), राजेश धोंडिबा ढेबे (१४), अनिकेत गोविंद जाधव (१४, रा. आकलपे) अशी विद्यार्थ्यांची नावे आहेत.वाघवळे येथील मल्लिकार्जुन विद्यालयात हे सर्व विद्यार्थी नववीमध्ये शिकत आहेत. गुरुवारी सायंकाळी सात वाजता शाळेतच जादा तास सुरू असताना सात मुलींना अचानक अस्वस्थ वाटू लागले. अंगाची आग होऊ लागली. त्यामुळे शिक्षकांनी वर्ग बंद करून नेमका काय प्रकार आहे, हे पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर काढले. शरीरावर कोठेच जखमा अथवा ओरखडे दिसत नव्हते. तरीही मुलींना काय चावले, हे पाहण्यासाठी शिक्षकांनी ज्या ठिकाणी मुली बसल्या होत्या, त्या बेंचवर तीन मुलांना बसविले. त्या तिन्ही मुलांना शरीराची आग होऊ लागली. नेमके काय चावतेय ते दिसत नव्हते. त्यामुळे शिक्षकही संभ्रमात पडले. शिक्षकांनी पुन्हा काही ग्रामस्थांना बोलावले. त्यांनाही बेंचवर बसविले. मात्र, ग्रामस्थांना काहीच झाले नाही. परंतु सात मुली आणि तीन मुलांना त्रास होऊ लागला. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना वाघवळे येथील प्राथमिक केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र, पुन्हा प्रकृती बिघडल्याने त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. (प्रतिनिधी)शाळेत गेल्यानंतरच त्रासगुरुवारी सायंकाळी सात वाजता प्रथम सात मुलींना काहीतरी चावले. या सर्व विद्यार्थ्यांवर रात्री वाघवळे येथील प्राथमिक केंद्रात उपचार करण्यात आले. काही वेळातच सर्व मुले ठणठणीत झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी शाळेत आल्यानंतर पुन्हा सर्व मुलांना त्रास होऊ लागला. त्यामुळे नेमका काय प्रकार आहे, हे अद्याप कोणाला समजले नाही. मुलांच्या रक्ताचे नमुने पुण्याला पाठविण्यात आले आहेत.