शहरं
Join us  
Trending Stories
1
तिढा सुटला, विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसची माघार, अंबादास दानवे असतील मविआचे उमेदवार
2
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
3
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! उद्या शेअर बाजारात कामकाज होणार का? ट्रेडिंगपूर्वी चेक करा नवं हॉलिडे कॅलेंडर
4
मोठी बातमी! बच्चू कडू यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण घेतले हाती; "झेंडा बदलला पण अजेंडा नाही.."
5
रियान परागला मोठा धक्का! ड्रेसिंग रूममध्ये स्मोकिंग केल्याप्रकरणी BCCIने केली कठोर कारवाई
6
खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव!
7
माचिसची काडी पेटवली अन् भडका उडाला, सिलेंडरच्या स्फोटात कुटुंबातील ७ जण होरपळले
8
काय म्हणावं आता! लग्नात इतक्या जोरात डीजे वाजवला की १४० कोंबड्या मेल्या; मालक चिडला अन्...
9
Sonam Raghuvanshi : “आम्ही वकील केला नाही, जामीनही नाही, जास्त त्रास दिला तर...”; सोनम रघुवंशीच्या भावाची धमकी
10
कर्ज फेडलं पण आता डूख धरून बसला पाकिस्तान; दुबईचा बदला घेणार, 'या' गर्भश्रीमंतला अटक करण्याची तयारी 
11
पुष्टिपती विनायक जयंती २०२६: नववर्षातील बाप्पाचा पहिला जन्मोत्सव; ‘या’ अवताराची कथा माहितीये का?
12
जिनिलियाने उलगडली 'राजा शिवाजी'च्या निर्मितीमागची गोष्ट; म्हणाली, "तडजोड केली नाही..."
13
सराफा बाजारात सोन्याचा दर किती? दागिने बनवायचे तर..., सोन्या-चांदीच्या किमतींत पुन्हा उसळी...
14
पेट्रोल ना डिझेल; 'या' कंपनीच्या इलेक्ट्रिक गाड्यांना मोठी मागणी, टाटा-महिंद्राला मागे टाकले...
15
$१ ची किंमत ₹९५.२०: डॉलरच्या समोर रुपया धराशाही; पहिल्यांदाच विक्रमी नीचांकी स्तरावर भारतीय चलन
16
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
17
‘शिवाजी कोण होता?’ उर्दू आवृत्तीच्या २५ हजारांवर प्रतींची विक्री, पुस्तक पोहोचले पाकिस्तानात
18
९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री! जिच्या नावाने भारताने पाकिस्तानवर डागलेली मिसाईल
19
स्मार्टफोन जगतात मोठी खळबळ: OnePlus आणि Realme चं मर्जर होणार? पाहा डिटेल्स
20
कोल्हापुरी ब्रँड 'प्राडा'ने स्वीकारला, नवीन चप्पल बाजारात; ३० जणांना इटलीत प्रशिक्षणाची संधी
Daily Top 2Weekly Top 5

जमावासमोर मुलाचा नदीत बुडून मृत्यू

By admin | Updated: April 21, 2015 01:01 IST

तारळेतील घटना : बचावासाठी युवकांनी केलेल्या प्रयत्नांना अपयश

तारळे : तारळी नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या संतोष दीपक भांदिर्गे (वय १३) या शाळकरी मुलाचा बुडून मृत्यू झाला. सोमवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, घटनेवेळी नदीपात्रावर धुणे धुण्यासाठी काही महिलांही नदीपात्रावर आल्या होत्या. त्यांच्यासमोरच संतोष गटांगळ्या घेत नदीपात्रात बुडाला. त्यामुळे उपस्थित महिलांनीही मोठा आक्रोश केला. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, तारळी धरणातून सध्या नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे नदीपात्र दुथडी भरून वाहत आहे. अशातच तारळे गावातील काही मुले व युवक दररोज सकाळी नदीपात्रात पोहण्यासाठी जातात. सोमवारी सकाळी गावातील संतोष भांदिर्गे हा शाळकरी मुलगा नदीपात्रात पोहण्यासाठी आला होता. त्यावेळी नदीवर कपडे धुण्यासाठी गावातील काही महिलांही आल्या होत्या. संतोष नदीपात्रात पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने तो गटांगळ्या घेऊ लागला. ही घटना निदर्शनास आल्यानंतर धुणं धुणाऱ्या महिलांनी आरडाओरडा केला. त्यावेळी मिलिंद कुंभार, सचिन राऊत, प्रशांत भांदिर्गे, संतोष दळवी, पोपट गायकवाड, प्रशांत ढवळे, सुनील कुंभार, पिंटू कोळी आदी युवकांनी नदीकडे धाव घेतली. तोपर्यंत संतोष पाण्यात बुडाला होता. युवकांनी नदीपात्रात उडी घेऊन त्याला बाहेर काढले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर संतोषच्या नातेवाइकांनीही नदीकडे धाव घेतली. त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने संतोषला उपचारार्थ प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. तारळे पोलीस दूरक्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. तसेच शवविच्छेदनानंतर संतोषचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. (वार्ताहर) नातेवाइकांचा आक्रोशसंतोष हा गावातीलच हायस्कूलमध्ये सातवीत शिक्षण घेत होता. खेळकर स्वभावामुळे गावातील सर्वांचा तो परिचयाचा होता. संतोषचे वडील दीपक यांचा सलूनचा व्यवसाय आहे. आई गृहिणी असून, त्याला छकुली नावाची धाकटी बहीण आहे. शवविच्छेदनानंतर संतोषचा मृतदेह घरी आणताच आई, वडील, आजी, आजोबांसह इतर नातेवाइकांनी आक्रोश केला.