शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदेही राबताहेत शेतात!, भात लावणीत मग्न 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2023 18:13 IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कुटुंबाने कधीही तुटू दिली नाही गावाची आणि शेतीची नाळ 

पेट्री : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रोजच्या धावपळीतून आपल्या जन्मगावी महाबळेश्वर तालुक्यातील दरे तर्फे तांब येथे प्रत्येक वर्षी भात लावणीसाठी येत असतात. इथे आल्यावर आपल्या शेतात स्वतः शेतकरी बनून कामे करतात. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्र्यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे गेली दोन दिवस भात लावणीत मग्न झाले आहेत.कोयना काठचे शेतकरी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या गावी दरे तर्फे तांब (ता. महाबळेश्वर) येथे आल्यावर शेतीतील सर्व कामे करतात. मात्र, यावेळी पावसाळा उशिरा सुरू झाला. भात लावणीही लांबली. राज्याचे पावसाळी अधिवेशनही सुरू झाले. त्यामुळे खासदार श्रीकांत शिंदे यांनी यावर्षी भात लावणीची जबाबदारी घेतली आहे. तेही आता शेतीत भात लावणी करताना दिसत होते. आपल्या शेतात त्यांनी छोट्या ट्रक्टरच्या साह्याने चिखल केला. तर त्यापाठोपाठ त्यांनी भाताचा तरवा काढण्यासही मदत केली. चिखल करण्यासही ते मदत करताना दिसत होते.बऱ्याचदा उच्चपदस्थ मंडळी शेतीच्या नादाला लागत नाहीत. परंतु मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबाने आपल्या गावाची आणि शेतीची नाळ कधीही तुटू दिली नाही. मी कोण मोठा आहे हे न दाखवता ते नेहमी गावी आल्यावर शेतात झाडे लावणे, स्ट्रॉबेरी लागवड, भात शेती यांची कामे ते आस्थेवाईकपणे करतात. त्यामुळे आता मुख्यमंत्री झाले तरी एकनाथ शिंदे शेतात जात होते. दोन दिवसांपूर्वी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे गावी आले असता, ते दोन दिवस भात लावणी करण्यात मग्न झाले होते.

शिवारात घुमताहेत भलरीचे स्वर !भात लावणी करत असताना करमणुकीसाठी व कामाचा कंटाळा येऊ नये यासाठी तालावर भलरी गीते म्हटली जातात. या ठिकाणीही भलरी गीतांच्या तालावर भात लावणी करण्यात आली. भाताची लावणी करण्यासाठी अनेकांची आवश्यकता असल्याने लावणी करताना कंटाळा येऊ नये यासाठी ही गीते म्हटली जातात. त्यामुळे कामही लवकर होते.

पानापानातून वाढणारे झाड, भात शेतीत वाढणारी भात रोपं, जिवंत बहरणारा हिरवा डोंगर आणि पावसाचा कणाकणात रुजण्याचा सोहळा, हे सगळं पाहणे म्हणजे एक ऊर्जा असते. शेतीत राबताना त्या बळीराजाच्या कष्टाची व आपल्या हातात असलेल्या जबाबदारीची जाणीव देते. आज भाताची लावणी करताना तीच जाणीव प्रत्येक रोपात होती. -डॉ. श्रीकांत शिंदे खासदार, ठाणे

टॅग्स :Satara areaसातारा परिसरChief Ministerमुख्यमंत्रीEknath Shindeएकनाथ शिंदेfarmingशेतीShrikant Shindeश्रीकांत शिंदे