शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

मुख्यमंत्र्यांसह त्यांचे सैन्य हे भाजपचे भाडोत्री सरकार!, संजय राऊतांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2023 19:02 IST

शंभूराज देसाई पालकमंत्री नव्हे अहंकारी ‘मालकमंत्री’

कऱ्हाड (सातारा) : ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांचे सैन्य म्हणजे भाजपचे भाडोत्री सरकार आहे. ते भाजपवरच उलटणार आहे. शंभूराज देसाई हे पालकमंत्री आहेत. मात्र, ते ‘मालकमंत्री’ असल्याचा आविर्भाव आणतात. त्यांच्यात अहंकार निर्माण झालाय. त्यामुळे त्यांचा पराभव अटळ आहे,’ अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केली.कऱ्हाडात रविवारी पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. खासदार संजय राऊत म्हणाले, ‘सध्या सरकार असूनही भाजप हतबल आहे. हतबल होण्याशिवाय त्यांच्याकडे पर्यायच राहिलेला नाही. रशियात राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्यावर त्यांनीच नेमलेले भाडोत्री सैन्य उलटले. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांचे सैन्य भाजपवर उलटल्याशिवाय राहणार नाही. भाजप भाडोत्री सैन्य घेऊन राज्य कारभार करीत आहे. त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागणार आहेत. भाडोत्री कोणाचेच नसतात. ते बाजारबुणगे आहेत. हे भाडोत्री सरकार उलथवून टाकल्याशिवाय जनता स्वस्थ बसणार नाही. आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीत सत्ता उलथवून टाकण्यासाठी महाविकास आघाडी एकत्रित लढणार असून ज्याठिकाणी ज्या पक्षाची निवडून येण्याची क्षमता आहे तेथे त्या पक्षाचाच उमेदवार देण्याबाबतची चर्चा महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये सुरू आहे. सत्तापालट करण्यासाठी जे योग्य असेल तेच आम्ही करू.’‘शंभूराज देसाई हे पालकमंत्री आहेत; पण अहंकारामुळे ते ‘मालकमंत्री’ बनलेत. मी म्हणेल तसेच आणि मी म्हणेल तेच, अशी त्यांची हुकूमशाही सुरू आहे. दिल्लीत हुकूमशाही चालली नाही. मग गल्लीत काय चालणार. आगामी निवडणुकीत शंभूराज देसाईंचा निश्चितपणे पराभव होईल. आपल्या आजोबांना लोकनेते ही उपाधी का दिली होती, याचा विचार शंभूराज देसाई यांनी करावा. लोकनेत्यांचे कार्य आजही आदर्शवत आहे. मात्र, त्यांच्या नातवाने शेण खाल्ले. काँग्रेस पक्षात असूनही मराठी माणसासाठी लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला होता. महाराष्ट्र उभारणीत त्यांनी योगदान दिले होते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरEknath Shindeएकनाथ शिंदेSanjay Rautसंजय राऊतBJPभाजपा