तपासणी अर्धशतकी... मात्र रुग्ण त्रिशतकी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:26 IST2021-06-22T04:26:14+5:302021-06-22T04:26:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कोरोना संसर्गाच्या मगरमिठीतून बचावलो म्हणून हुश्श करणाऱ्या विलासपूर आणि करंजे भागातील नागरिकांना आता डेंग्यूने ...

तपासणी अर्धशतकी... मात्र रुग्ण त्रिशतकी!
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : कोरोना संसर्गाच्या मगरमिठीतून बचावलो म्हणून हुश्श करणाऱ्या विलासपूर आणि करंजे भागातील नागरिकांना आता डेंग्यूने घेरले आहे. या दोन्ही भागात प्रत्येक घरात किमान एक डेंग्यू रूग्ण आढळून आल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. आरोग्य यंत्रणेकडून या दोन्ही भागांतून पन्नासहून कमी घरांची तपासणी करण्यात आली. मात्र, येथे तीनशेहून अधिक डेंग्यू बाधित आहेत.
हद्दवाढीमध्ये करंजे आणि विलासपूर हे भाग सातारा पालिकेच्या अखत्यारित आले. अतिरिक्त आलेल्या भागाबरोबर पालिकेकडे वाढीव मनुष्यबळ नसल्याने या भागातील आरोग्याचे प्रश्न अधिक गंभीर बनू लागले आहेत. पालिकेच्या वतीने ४ जूनला विलासपूरमध्ये अबेटिंग करण्यात आले. त्यानंतर दर चार पाच दिवसांनी विशिष्ट भागात नागरिकांनी संपर्क साधल्यानंतर फवारणी करण्यात येते.
जिल्हा शासकीय रूग्णालयात कोविडच्या तपासण्यांचा ताण असल्यामुळे विलासपूर आणि करंजे भागातील बहुतांश नागरिकांच्या डेंग्यूची तपासणींचे अहवाल प्राप्त झाले नाहीत. मात्र, नागरिकांनी खासगीत केलेल्या तपासणी आणि डेंग्यूसदृश आढळणाऱ्याºरूग्णांवर हिवताप विभाग लक्ष ठेवून आहे.
पार्इंटर
- डेंग्यू असा होतो
एडीस डासामुळे होतो डेंग्यू
या डासावर चित्त्यासारखे पट्टे
पहाटेच्या वेळी डास करतो घरात प्रवेश
एडीस डास कमी उंचीपर्यंत उडू शकतो
पावसाळ्याच्या दिवसांत पाय झाकले जातील असे कपडे घाला
डेंग्यूचा तापामुळे शरीरात रक्ताची कमी निर्माण होते
रक्तातील पांढऱ्याºपेशींची संख्या झपाट्याने कमी होऊन एखादा अवयव निकामी होऊ शकतो.
(चौकट)
- डेंग्यू तापाची लक्षणे :
खूप ताप येणे
डोळे जळजळणे
अंगदुखी
कंटाळा येणे
उलट्या होणे
त्वचेवर लाल चट्टे येणे
डोकेदुखी
भूक मरणे
(चौकट)
साचलेलं पाणी धोक्याचं
पावसाळ्यात खूप ठिकाणी पाणी साचते. या साचलेल्या पाण्यामध्ये डासांची उत्पत्ती होते. डासांमुळे डेंग्यूच नाही तर मलेरिया होण्याची देखील शक्यता असते.
(चौकट)
अशी घ्या काळजी
१. मॉस्किटो क्रिम
डेंग्यू झाल्यानंतर किंवा तुमच्या आजूबाजूला डेंग्यूचे रुग्ण असतील तर तुम्हाला काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे असते. कारण जर अशा रुग्णांना डास चावला आणि तो तुम्हाला चावला तर तुम्हालादेखील डेंग्यूचा त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे डासांपासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी मॉस्किटो क्रिम लावा.
२. कचऱ्याचे नियोजन आवश्यक
कचऱ्याचे नियोजन करणे हे फार गरजेचे असते. पावसात अनेक ठिकाणी पाणी साचते. या साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती होते. ओल्या कचऱ्यावरदेखील डासांची उत्पत्ती असते. मुळात जिथे घाण असते, तिथेच डासांची उत्पत्ती होते. त्यामुळे तुम्ही कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करायला हवे.
३. दारे-खिडक्या करा बंद
घरात येणारे डास हे डेंग्यूचेच आहेत की नाही हे लगेचच कळू शकत नाही. पण जर आजूबाजूला डेंग्यूचे रुग्ण असतील तर अशा वेळी खबरदारी घेणे जास्त गरजेचे असते. म्हणूनच घरी येणाऱ्या डासांना रोखण्यासाठी पहाटे आणि संध्याकाळच्या वेळी दारे-खिडक्या बंद करायला विसरू नका. जर दारे-खिडक्या बंद करणे शक्य नसेल तर तुम्ही त्यांना जाळ्या तरी लावा.
३. आहाराची भूमिका महत्त्वपूर्ण
पपईच्या पानांचा रस दिवसातून दोनदा घ्यावा. बकरीचे दूध रोगप्रतिकारशक्ती वाढवू शकते म्हणून हे दूध प्यायला हवे. कडुनिंबाचा काढा किंवा कडुनिंबांची पाने तुम्ही या दिवसात नक्कीच खायला हवी. तुळशीचे औषधी गुणांचा तुम्हाला या दिवसात चांगला फायदा होऊ शकतो. तापानंतर आरोग्य सुधारण्यासाठी गुळवेलीचा काढा पिण्याचा सल्ला दिला जातो. मेथीमध्ये भरपूर लोह असते. त्यामुळे आहारात तुम्ही मेथीचा समावेश करायला हवा. यासह ड्रॅग्नफ्रुटचे सेवनही उपयुक्त ठरते.
(चौकट)
तपासणीचा लेखाजोखा
करंजे :
एकूण तपासलेली घरे : ४२
डास आळी पॉझिटिव्ह घरे : ९
एकूण तपासलेले कंटेनर : १५७
पॉझिटिव्ह कंटेनर : २१
विलासूपर :
एकूण तपासलेले बंगले : ३३
डास आळी पॉझिटिव्ह घरे : ५
एकूण तपासलेले कंटेनर : ९७
पॉझिटिव्ह कंटेनर : ९
(चौकट)
हाऊस इंडेक्सने ओलांडली धोक्याची पातळी
डास अळ्यांचे प्रमाण ‘हाऊस इंडेक्स’नुसार मोजले जाते. यासाठी हिवताप विभागाकडून घरांचा व पाण्याने भरलेल्या कंटेनरचा सर्व्हे केला जातो. तपासलेली एकूण घरे व कंटेनरचा भागाकार करून हाऊस इंडेक्स काढला जातो. निर्देशांक १० अथवा त्याहून कमी असल्यास धोका कमी संभवतो. मात्र निर्देशांक १० हून अधिक असल्यास तो परिसर ‘रेड झोन’ म्हणून जाहीर केला जातो. करंजेसह परिसराचा हाऊस इंडेक्स सध्या २१ इतका नोंदविण्यात आला आहे.