शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आठवडाभर गारपीटीसह अवकाळीची शक्यता; शेतकऱ्यांनो सावध रहा....
2
सामाजिक विविधतेसाठी अधिक पोषक होतेय वातावरण; हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली
3
बारामतीची निवडणूक संपली अन् पवार कुटुंबातला मुलगा, मुलीचा मुद्दा पुन्हा चर्चेत
4
‘विराट’ कामगिरीमुळे RCBचं आव्हान कामय, पण प्लेऑफमध्ये जाण्यासाठी लागेल नशिबाची साथ, आणि...
5
संपादकीय: शरद पवारांचा खडा अन् विरोधक उद्धव ठाकरेंच्या मागे लागले...
6
विवाह नोंदणी नाही तर प्राजक्ता माळीने 'या' कागदपत्रांवर केली सही, नेटकऱ्यांनी लावले अंदाज
7
इलेक्शन ड्युटी टाळण्यासाठी पुरुष शिक्षकाने गर्भवती असल्याचे भासवले; अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले
8
आजचे राशीभविष्य - १० मे २०२४; इतर काही मार्गानी आर्थिक लाभ होतील, व्यवसायात प्रगती होईल
9
सलग ३४ वर्षे आमदार! सुरेशदादा जैन सक्रिय राजकारणातून निवृत्त; उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
10
एअर इंडियाचा संप मागे; 'ते' कर्मचारी कामावर
11
प्रियांका गांधी अखेर मैदानात उतरल्या! जिथे जिथे जातात...
12
दिंडोरीत अजित पवार नाराज, नंदुरबार-जळगावात शिंदे गट; असहकार्याने महायुतीत टेन्शन! 
13
आजी, माजी गृहमंत्री एकाच हॉटेलात मुक्कामी पण...दोघेही म्हणतात आम्ही एकमेकांना भेटलो नाही
14
खासदारकीसाठी कुणाकुणाला भेटलात, दावोसच्या गुलाबी थंडी काय केले? प्रियंका चतुर्वेदींना शिंदे सेनेचा सवाल
15
द्वेष नव्हे तर नोकरी निवडा; 'इंडिया' येणार अन् ३० लाख नोकऱ्या देणार
16
या समोरासमोर अन् एकदा काय ती चर्चा होऊनच जाऊद्या! माजी न्यायाधीशांचे पंतप्रधान अन् राहुल गांधींना आमंत्रण
17
प्रचारात मोदी टॉपवर; आतापर्यंत ८३ सभा! प्रचार करण्यात विरोधक जवळपासही नाहीत
18
साचलेले प्रश्न, दमलेले कार्यकर्ते, मरगळलेला प्रचार
19
सत्ताधारी वायएसआर काँग्रेसला अँटी इन्कम्बन्सीची भीती; सर्व जमिनींची नोंद 'या' पक्षाला महागात पडणार?
20
डॉ. दाभोलकर हत्या खटल्याचा आज निकाल; घटनेला १० वर्षे, अडीच वर्षे चालली सुनावणी

शरद पवार यांची अवस्था केविलवाणी: चंद्रशेखर बावनकुळे

By नितीन काळेल | Published: April 27, 2024 10:13 PM

बारामतीत घरोघरी फिरावे लागत आहे; भ्रष्टाचार मान्य आहे का?

नितीन काळेल, लोकमत न्यूज नेटवर्क, सातारा : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची केविलवाणी परिस्थिती आहे. त्यांना बारामतीत घरोघरी फिरावे लागत आहे. आताच्या या निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे महाराष्ट्रातील सर्व उमेदवार पराभूत होतील आणि पवार गट शून्य होईल, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. तर शशिकांत शिंदे यांच्या प्रश्नावर बावनकुळे यांनी, कोणी भ्रष्टाचार केला असेल तर तो शरद पवार यांना मान्य आहे का ? असा सवाल केला. 

सातारा येथे भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यानंतर बावनकुळे यांनी पत्रकारांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या.  विविध प्रश्नांना उत्तरेही दिली. यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी, आदी उपस्थित होते. 

बावनकुळे म्हणाले, देशातील इंडिया आघाडीकडे पंतप्रधानपदाचा एकही उमेदवार नाही. या उलट दरवर्षाला पंतप्रधान बदलायचा, असा ते विचार करतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही पंतप्रधानपदापर्यंत जाण्यासाठी खूप प्रयत्न केले; पण, ते जमले नाही. त्यांचे नाव पंतप्रधान मोदींबरोबर कशासाठी जोडले जाते, हेच कळत नाही. 

महाविकास आघाडीचे सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांना अटक केली तर महाराष्ट्रात संघर्ष करू, असा इशारा शरद पवार यांनी दिल्याचा प्रश्न पत्रकारांनी केल्यावर बावनकुळे यांनी, त्यांनी संषर्घ केला तरी जनता हे मान्य करणार नाही. कारण, कोणी भ्रष्टाचार केला असेल तर तो पवार यांना मान्य आहे का ?, पवार यांनी त्यांना भ्रष्टाचार करण्याचे प्रमाणपत्र दिले आहे का? असा सवाल केला; तर शरद पवार यांनीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ते रशियाचे पुतीन अशी टीका केल्याचा प्रश्न पत्रकारांनी केल्यावर बावनकुळे यांनी ‘कुठे मोदी आणि कुठे पवार ? त्यांची केविलवाणी स्थिती झाली आहे,’ अशी टीका केली.४ जूनला कळेल ताकद

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दहिवडीतील सभेत महाविकास आघाडीचे महाराष्ट्रात ३२ ते ३५ उमेदवार जिंकतील, असा दावा केल्याचा प्रश्न पत्रकारांनी केला. यावर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी २०१९ प्रमाणेच सुप्त लाट आहे. ही त्सुनामीसारखी आहे. त्यामुळे ४ जूनलाच त्यांना समजेल काय ते, असे स्पष्ट केले. 

टॅग्स :Chandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेChandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४satara-pcसातारा