शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

माजी सैनिकाचं घराचं स्वप्न राहिलं अधुरं, रहिमतपूरचे चंद्रशेखर जंगम यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 18:01 IST

पाकिस्तानला १९६५ च्या युद्धात चारिमुंड्या चित करणारे रहिमतपूर येथील सुभेदार चंद्रशेखर जंगम यांना साताऱ्यांत मोक्याच्या ठिकाणी जागा मिळणार होती. जागेची मूल्यांकन रक्कम पन्नास वर्षांपूर्वी भरूनही त्यांना जागेचा ताबा मिळाला नाही. घरासाठी पन्नास वर्षे लढा देणारे चंद्रशेखर जंगम यांचे साताऱ्यांत सोमवारी रात्री निधन झाले. त्यामुळे त्यांचे घराचे स्वप्न अधुरेच राहिले.

ठळक मुद्देमाजी सैनिकाचं घराचं स्वप्न राहिलं अधुरंरहिमतपूरचे चंद्रशेखर जंगम यांचे निधन वयाच्या शंभराव्या वर्षी साताऱ्यात घेतला अखेरचा श्वास

सातारा/रहिमतपूर : पाकिस्तानला १९६५ च्या युद्धात चारिमुंड्या चित करणारे रहिमतपूर येथील सुभेदार चंद्रशेखर जंगम यांना साताऱ्यांत मोक्याच्या ठिकाणी जागा मिळणार होती. जागेची मूल्यांकन रक्कम पन्नास वर्षांपूर्वी भरूनही त्यांना जागेचा ताबा मिळाला नाही. घरासाठी पन्नास वर्षे लढा देणारे चंद्रशेखर जंगम यांचे साताऱ्यांत सोमवारी रात्री निधन झाले. त्यामुळे त्यांचे घराचे स्वप्न अधुरेच राहिले.निवृत्त सुभेदार चंद्रशेखर मल्लिकार्जुन जंगम गेल्या ५० वर्षांपासून न्यायासाठी लढा देत होते. साताऱ्यातील तत्कालीन शासकीय धोरणानुसार जमिनीचे मूल्यांकन भरूनही केवळ लालफितीच्या भोंगळ कारभारामुळे जमिनीचा ताबा मिळत नाही. पाकिस्तानविरुद्धच्या लढाईतला नायक लालफितीच्या कारभारापुढे हतबल झाला होता.जंगम हे भारतीय सैन्यदलातून १९७१ मध्ये सेवानिवृत्त झाले. तत्कालीन शासकीय धोरणानुसार सेवानिवृत्त सैनिकांना योग्य मोबदल्यात जमिनी देण्यात येत होत्या. त्यानुसार २६ नोव्हेंबर, १९६४ रोजी साताऱ्याचे तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांकडे जंगम यांनी जमीन मिळण्याबाबत अर्ज केला होता.

अर्जाच्या अनुषंगाने तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी क्रमांक सीटीएस २२.०७ या आदेशाच्या संदर्भाने तत्कालीन नगरभूमापन नगररचनाकार सातारा यांच्याकडून मूल्यांकन करून घेत रविवार पेठ, १६६/अ,१ या शासकीय जागा मंजूर केली.

जमिनीच्या कब्जाहक्काची रक्कम भरण्याबाबत २० सप्टेंबर १९६८ रोजी जंगम यांना पत्राद्वारे कळवले. त्याप्रमाणे ११ आॅक्टोबर १९६८ रोजी शासकीय चलन क्रमांक २७ ने शासकीय कोषागारात जंगम यांनी मंजूर प्लॉंटची रक्कम रुपये ३ हजार ६४७ रुपये भरली.

जंगम यांना ही जागा मंजूर झाल्याचे व तिची कब्जा हक्काची रक्कम शासकीय कोषागारात भरल्याबाबतचे स्वयंस्पष्ट पत्र तत्कालीन नगरभूमापन अधिकारी, सातारा यांनी २१ एप्रिल १९६९ रोजी तत्कालीन जिल्हाधिकारी, सातारा यांना दिले होते.तरीही जंगम यांना मान्य मंजूर केलेल्या भूखंड नियमबाह्य पद्धतीने फाळणी प्रक्रिया न करता सीटीसर्व्हे नंबर १६६ अ/१ या जागेपैकी १५२५ चौरस फूट एवढी जागा भागीरथीबाई रघुनाथ बल्लाळ यांना दिली.

ही फसवणूक केली गेली असतानाच १९९७ मध्ये सातारा नगरपरिषद सातारा यांना आरक्षणांतर्गत उर्वरित जागा २ एप्रिल २००८ च्या आदेशाने जिल्हाधिकाऱ्यांनी हस्तांतरित केली. याबाबतची सर्व माहिती व कागदपत्रे जंगम यांना माहिती अधिकारात प्रशासनाकडून प्राप्त झाली होती.याबाबत २०१७ च्या विधिमंडळ अधिवेशनात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यानंतर पुन्हा हिवाळी अधिवेशनात आमदार जयकुमार गोरे यांनीही तारांकित प्रश्न उपस्थित करून जंगम यांच्यावर झालेल्या अन्यायाबाबत वाचा फोडली होती. घराचे स्वप्न उराशी बाळगूळ पन्नास वर्षे प्रशासकीय लढा दिलेले माजी सैनिक चंद्रशेखर जंगम यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.ब्रह्मपुरीत अंत्यसंस्कारमाजी सैनिक जंगम यांच्यावर मंगळवारी श्रीक्षेत्र ब्रम्हपुरी येथे वीरशैव लिंगायत समाज स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर