Chain extended by pressing the neck of an old man in the seventies | साताऱ्यात वृद्धाची मान दाबून चेन लांबविली

साताऱ्यात वृद्धाची मान दाबून चेन लांबविली

ठळक मुद्देसाताऱ्यात वृद्धाची मान दाबून चेन लांबविलीदोघे चोरटे दुचाकीवरून पसार

सातारा : दुकानात घुसून वृद्धाची मान दाबून अडीच तोळ्यांची चेन लांबविल्याची खळबळजनक घटना रविवारी सकाळी साडेनऊ वाजता मंगळवार पेठेत घडली.

याबाबत अधिक माहिती अशी, प्रकाश गेणू सोळसकर (वय ६७, रा. मंगळवार पेठ सातारा) यांचे मंगळवार पेठेत किराणा मालाचे दुकान आहे. रविवारी सकाळी ते दुकानात बसले होते. त्यावेळी दोन युवक च्युर्इंगम व विक्सच्या गोळ्या घेण्याच्या बहाण्याने दुकानात आले.

सोळसकर यांना काही कळायच्या आत संबंधित दोघा चोरट्यांनी त्यांची मान खालू दाबून त्यांच्या गळ्यातील सुमारे ७५ हजारांची अडीच तोळ्यांची चेन हिसकावून नेली. त्यानंतर दोघे चोरटे दुचाकीवरून पसार झाले.

या प्रकारानंतर सोळसकर यांनी आरडाओरड केली. मात्र, तोपर्यंत चोरटे दिसेनासे झाले. शाहूपुरी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.

Web Title: Chain extended by pressing the neck of an old man in the seventies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.