शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
4
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
5
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
6
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
7
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
8
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
9
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
10
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
11
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
12
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
13
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
14
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
15
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
16
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
17
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
18
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
19
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
20
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी

बाहेरील भिंतीवरून टाकले जातात सातारा कारागृहात मोबाईल, एका कैद्याकडून मोबाईल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2018 8:36 PM

जेलच्या भिंतीवरून आत मोबाईल टाकून त्याचा कैदी सर्रास वापर करत असल्याची धक्कादायक घटना सातारा जिल्हा कारागृहात उघडकीस आली आहे. याप्रकरणी एका कैद्याकडून मोबाईल जप्त करून सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

सातारा -  जेलच्या भिंतीवरून आत मोबाईल टाकून त्याचा कैदी सर्रास वापर करत असल्याची धक्कादायक घटना सातारा जिल्हा कारागृहात उघडकीस आली आहे. याप्रकरणी एका कैद्याकडून मोबाईल जप्त करून सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सातारा जिल्हा कारागृहाच्या शौचालयामध्ये कैदी संजय नामदेव जाधव (वय ३९, रा. पिंपळवाडी, पो. धावडशी, ता. सातारा) हा खाली बसून मोबाईलवर बोलत असताना कारागृह पोलीस कर्मचा-याने त्याला पकडले. याबाबत माहिती अशी की, दत्तात्रय ज्ञानदेव चव्हाण (४८, कारागृह पोलीस कर्मचारी) यांनी कारागृहातील सर्व कैद्यांना सकाळी साडेसहा वाजता खुले केले. त्यानंतर सकाळी दहा वाजता सर्कल नंबर दोनच्या पाठीमागील शौचालयातील शेवटच्या शौचालयामध्ये दोघेजण बोलत असल्याचा आवाज येत होता. म्हणून चव्हाण त्याठिकाणी पाहण्यासाठी गेले असता संजय जाधव हा खाली बसून मोबाईलवर बोलत असल्याचे निदर्शनास आले. त्याच्याकडून मोबाईल ताब्यात घेऊनसुभेदार व कारागृह अधीक्षकांसमोर चौकशी केली असता त्याने ‘चार दिवसांपूर्वी त्याचा मुलगा मुलाखतीस आला होता. त्यावेळी त्याला मोबाईल जेलच्या बाहेरील भिंतीवरून आत टाक, असे सांगितले. त्याप्रमाणे मुलाने मोबाईल जेलमध्ये टाकला. तो मोबाईल घेऊन त्याचा वापर करीत होता,’ अशी कबुली दिली. यावरून सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर करीत आहेत.

टॅग्स :MobileमोबाइलjailतुरुंगSatara areaसातारा परिसरMaharashtraमहाराष्ट्र