खबरदारी... यवतेश्वर धोकादायक दरड काढण्यास प्रारंभ
By दीपक देशमुख | Updated: July 24, 2023 09:54 IST2023-07-24T09:53:09+5:302023-07-24T09:54:20+5:30
तहसील प्रशासनाच्या मार्फत ही कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

खबरदारी... यवतेश्वर धोकादायक दरड काढण्यास प्रारंभ
दीपक देशमुख
सातारा : अतिवृष्टीमुळे सातारा तालुक्यातील सांबरवाडी हद्दीतील सातारा - यवतेश्वर - कास या घाटातील धोकादायक बनलेली दरड सोमवारी सकाळी नऊ वाजता काढण्यास प्रारंभ झाला. सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच जिल्हा आणि तहसील प्रशासनाच्या मार्फत ही कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
खबरदारी म्हणून रविवार दि. 23जुलै2023 रोजी रात्री 12वाजल्यापासून ते सोमवार दि. 24 जुलै 2023 रोजीचे रात्री 12 वाजेपर्यंत बोगदा ते यवतेश्वर - कास रस्ता सर्वप्रकारच्या वाहतूकीस पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. दगड फोडण्याची कार्यवाही सुरु असताना, सदर ठिकाणापासून कमीतकमी 200 ते 300 मीटर परिसरात कोणी व्यक्ती/पशूधनास प्रवेशास मनाई करण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची जिवीत हानी होऊ नये म्हणून महादरे गावाच्या दक्षिणेकडील बाजूस शेतीच्या कामाकरिता, गुरे राखण्याकरिता व इतर कारणासाठी नागरिकांना जाणेस पूर्णपणे मनाई करण्यात आली आहे.