भरधाव कारची दुचाकीला धडक, साताऱ्यातील युवक गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 18:36 IST2017-11-15T18:33:14+5:302017-11-15T18:36:49+5:30

पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर येथील लिंबखिड परिसरात भरधाव कारने दिलेल्या धडकेत येथील शुक्रवार पेठेतील युवक गंभीर जखमी झाला. हा अपघात बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास झाला.

A car of two brothers, a constable of Sataran, was seriously injured | भरधाव कारची दुचाकीला धडक, साताऱ्यातील युवक गंभीर जखमी

भरधाव कारची दुचाकीला धडक, साताऱ्यातील युवक गंभीर जखमी

ठळक मुद्देशंभर फूट उडून रस्त्याच्या कडेला फेकला गेलासाताऱ्यातील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल

सातारा : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर येथील लिंबखिड परिसरात भरधाव कारने दिलेल्या धडकेत येथील शुक्रवार पेठेतील युवक गंभीर जखमी झाला. हा अपघात बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास झाला.


राजनील सदाशिव पटेल (वय २३, रा. शुक्रवार पेठ, सातारा) असे गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, राजनील हा बुधवारी सकाळी पुण्याहून दुचाकीने साताऱ्यात येत होता. लिंबखिंड परिसरात आल्यानंतर त्याच्या दुचाकीला पाठीमागून आलेल्या भरधाव कारने जोरदार धडक दिली. या धडकेत राजनील सुमारे शंभर फूट उडून रस्त्याच्या कडेला फेकला गेला.

या अपघातानंतर कार चालकाने तेथून पलायन केले. काही नागरिकांच्या हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर राजनीलला खासगी वाहनाने जिल्हा शासकीय रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, त्याच्या नातेवाइकांनी त्याला साताऱ्यातील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले आहे.


राजनील हा पुण्यातील एका कंपनीत काम करत आहे. दोन दिवस सुटी काढून तो घरी येत होता. ज्या कारने त्याला धडक दिली. ती कार पांढऱ्या रंगाची आहे. कार वेगात असल्यामुळे त्याला नंबर स्पष्ट दिसला नाही, असे त्याच्या नातेवाइकांनी सांगितले.

Web Title: A car of two brothers, a constable of Sataran, was seriously injured