Satara: खड्डा चुकविताना सज्जनगडाजवळ कार दरीत कोसळली, पुण्यातील पाच जण जखमी
By दीपक शिंदे | Updated: September 27, 2024 13:41 IST2024-09-27T13:40:49+5:302024-09-27T13:41:15+5:30
सातारा : ठोसेघर येथे पर्यटनासाठी गेलेल्या पुण्यातील पर्यटकांची गाडी ठोसेघर हून साताऱ्याकडे येत असताना दरीत कोसळून पाचजण गंभीर जखमी ...

Satara: खड्डा चुकविताना सज्जनगडाजवळ कार दरीत कोसळली, पुण्यातील पाच जण जखमी
सातारा : ठोसेघर येथे पर्यटनासाठी गेलेल्या पुण्यातील पर्यटकांची गाडी ठोसेघर हून साताऱ्याकडे येत असताना दरीत कोसळून पाचजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना पुढील उपचारासाठी सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत घटनास्थळावर मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील काही पर्यटक काल गुरुवारी ( दि. २६ ) ठोसेघर येथे फिरण्यासाठी आले होते. आज सकाळी ठोसेघर येथून पुण्याकडे परत जाताना सज्जनगड फाटा जवळ खड्डा चुकविताना या गाडीला अपघात झाला.
या अपघातात पाच जखमी झाले आहेत. पर्यटकांची गाडी ही सज्जनगड फाट्यावरून दरीत कोसळली. यामुळे पर्यटक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.