महाबळेश्वर : आंबेनळी घाटात एक कार सुमारे १०० फूट खोल दरीत कोसळली. वळणदार रस्ता आणि तीव्र उताराच्या भागात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. आज, गुरुवारी (दि.२५) हा अपघात झाला.अपघाताची माहिती मिळताच प्रतापगड रेस्क्यू टीम आणि महाबळेश्वर सरजन रेस्क्यू टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. खोल दरी, घनदाट जंगल आणि अवघड भौगोलिक परिस्थितीमुळे बचावकार्य आव्हानात्मक ठरत असले, तरी दोरखंड, सुरक्षासाधने व आवश्यक उपकरणांच्या साहाय्याने मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.अपघातग्रस्त वाहनात किती प्रवासी होते आणि त्यांची स्थिती काय आहे, याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली असून पोलीस वाहतूक नियंत्रणात ठेवण्याचे काम करत आहेत.महाबळेश्वर परिसरातील आंबेनळी घाटात यापूर्वीही अपघातांच्या घटना घडल्या आहेत. वारंवार होणाऱ्या दुर्घटनांमुळे रस्ते सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. बचावकार्य पूर्ण झाल्यानंतर जखमींबाबतचा सविस्तर माहिती समोर येणार आहे.
Web Summary : A car fell into a 100-foot ravine in Ambenali Ghat near Mahabaleshwar. Rescue teams are on site, facing challenging terrain. The number and condition of passengers are currently unknown. Past accidents raise road safety concerns.
Web Summary : महाबलेश्वर के पास अम्बेनाली घाट में एक कार 100 फीट गहरी खाई में गिर गई। बचाव दल मौके पर हैं, जिन्हें मुश्किल इलाके का सामना करना पड़ रहा है। यात्रियों की संख्या और हालत फिलहाल अज्ञात है। पिछली दुर्घटनाओं से सड़क सुरक्षा को लेकर चिंता बढ़ गई है।