शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Satara: भरधाव कार-दुचाकीचा भीषण अपघात, एक ठार; शिवज्योत आणण्यासाठी निघाले असता घडली दुर्दैवी घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2024 12:29 IST

रशिद शेख  औंध : खटाव तालुक्यातील गोपूज येथे भरधाव कार व दुचाकीच्या भीषण अपघात एक जण ठार झाला. अपघातात ...

रशिद शेख औंध : खटाव तालुक्यातील गोपूज येथे भरधाव कार व दुचाकीच्या भीषण अपघात एक जण ठार झाला. अपघातात दोन्ही वाहनाचे मोठे नुकसान झाले असून दुचाकीवर असणारे दोन्ही युवक गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी कराड येथे हलविले.उपचारादरम्यान धनंजय शिंदे (वय-२५ रा. सूर्याचीवाडी ता. खटाव) याचा मृत्यू झाला. तर किरण जाधव (रा. सूर्याचीवाडी) हा गंभीर जखमी झाला. चारचाकी वाहनातील जखमीची माहिती अद्याप मिळू शकली नाही. मात्र चारचाकी दहिवडी ता. माण येथील असल्याची माहिती मिळाली. काल, रविवारी (दि.१८) हा अपघात झाला.याबाबत घटनास्थळवरून मिळालेली माहिती अशी की, सूर्याचीवाडी ता. खटाव येथील युवक शिवज्योत आणण्यासाठी दुचाकीवरून सज्जनगड येथे निघाले होते. दरम्यान गोपूज -औंध रोडवर राजपथ इन्फ्रा कपंनीच्या खडीच्या डेपोनजीक औंधकडून येणारी चारचाकी क्रमांक (एम. एच ११ डी. ए.००७५) यांच्यात भीषण धडक झाली. यामध्ये दुचाकीची पुढील बाजू तुटून दुसरीकडे पडली तर चारचाकी गाडी पलटी झाली. यावेळी सूर्याचीवाडी येथून पाठीमागून येणाऱ्या पीक-अप मधून दुचाकीस्वारांना उपचारासाठी हलविण्यात आले. तर चारचाकी गाडीतील जखमींना नागरिकांनी बाहेर काढले.हा अपघात एवढा भीषण होता की गाड्यांचा चक्काचूर झाला होता. अपघातस्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. औंध पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चिमणाजी केंद्रे करीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAccidentअपघातDeathमृत्यू