ब्रिटिशकालीन पुलाची शंभरी भरली !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 00:14 IST2019-07-18T00:14:03+5:302019-07-18T00:14:30+5:30
पाऊसकाळात पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास उपयोगी पडेल, असा पर्यायी दुसरा पूल अजूनही कृष्णा नदीवर तयार करण्यात आला नाही.

ब्रिटिशकालीन पुलाची शंभरी भरली !
वाई : वाई शहरात फुलेनगरमार्गे प्रवेश करीत असताना रविवार पेठेला जोडणाऱ्या किवरे ओढ्यावरील ब्रिटिशकालीन पुलावर झुडपांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. तसेच किसनवीर या मुख्य चौकास जोडणारा आणखीन एक ब्रिटिशकालीन पूल आहे. या पुलाला शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत. पाऊसकाळात पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास उपयोगी पडेल, असा पर्यायी दुसरा पूल अजूनही कृष्णा नदीवर तयार करण्यात आला
नाही.
वाई शहरामध्ये किसनवीर चौकाला जोडणारा कृष्णा नदीवरील बांधण्यात आलेला मुख्य पूल हा १८८४ मध्ये ब्रिटिशांच्या राजवटीत बांधण्यात आला आहे. या पुलाला १३३ वर्षे पूर्ण झाली आहेत. दरम्यान, पुलाला शंभर वर्षे पूर्ण झाल्यानतंर १९८४ मध्ये ब्रिटिश शासनाने महाराष्ट्र शासन व नगरपालिका यांना पुलाची मुदत संपल्याच्या बाबतीत पत्र पाठविले आहे. शासनाच्या वतीने याबाबत कोणतीही पावले उचलण्यात आली नाहीत. त्यामुळे वाई परिसारातील नागरिकांनी संतप्त प्रतिक्रया उमटत आहे. त्वरीत उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. या पुलावर मोठ्या प्रमाणावर झाडे-झुडपे वाढली आहेत. पालिका प्रशासनाच्या माध्यमातून दर चार महिन्यांतून पुलावरील वाढलेली झुडपे काढण्याचे काम केले जाते. दरम्यान, वाई शहरात वाहतुकीची वाढलेली क्षमता पाहता सक्षम पुलांची बांधणी शासनाने करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
सक्षम पुलांची गरज
वाई शहर हे ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे. प्रसिद्ध पर्यटनस्थळ असल्याने या ब्रिटिशकालीन पुलावर रहदारी मोठ्या प्रमाणावर असते. महागणपती मंदिरासमोर बांधण्यात आलेल्या नवीन पुलाची उंची कमी असल्याने पूरपरिस्थितीत या पुलाचा काहीच उपयोग होत नाही, त्यामुळे ब्रिटिशकालीन पुलाला पर्यायी पुलाची गरज आहे.
कृष्णा नदीवरील व फुलेनगरला जोडणाºया पुलावर वाढलेली झुडपे काढण्याचा ठेका दिला आहे. लवकरच ती काढण्यात येणार असून, तज्ज्ञांच्या सल्ल्याने झुडपांवर कायमस्वरुपी उपाययोजना करण्यात येणार आहे.
- विद्या पोळ, मुख्याधिकारी वाई नगरपालिका