सातारा  : हातावर बाटली फोडून युवकाची आत्महत्या, आजाराचे कारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 04:09 PM2018-02-07T16:09:27+5:302018-02-07T16:12:45+5:30

आजाराला कंटाळून युवकाने हातावर काचेची बाटली फोडून तसेच काचेने नस कापून घेऊन आत्महत्या केली. येथील बसस्थानकानजीकच्या मैदानात बुधवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

Breaking bottle of Satara, youth's suicide, due to illness | सातारा  : हातावर बाटली फोडून युवकाची आत्महत्या, आजाराचे कारण

सातारा  : हातावर बाटली फोडून युवकाची आत्महत्या, आजाराचे कारण

Next
ठळक मुद्देकऱ्हाडात बसस्थानकानजीक संपवले जीवनसहा महिन्यांपूर्वी त्याला क्षयरोग असल्याचे निदान घटनेची नोंद कऱ्हाड शहर पोलिसांत

कऱ्हाड : आजाराला कंटाळून युवकाने हातावर काचेची बाटली फोडून तसेच काचेने नस कापून घेऊन आत्महत्या केली. येथील बसस्थानकानजीकच्या मैदानात बुधवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

अशोक चंद्रकांत पवार-गुरव (वय ३६, रा. कऱ्हाड , मूळ रा. सोनवडे, संगमेश्वर, जि. रत्नागिरी) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, सोनवडेतील अशोक पवार हा युवक गत काही वर्षांपूर्वी कामाच्या शोधात कऱ्हाडमध्ये आला होता.

गतवर्षी तो शहरातील मुख्य टपाल कार्यालयानजीक असलेल्या हॉटेल वैष्णवीमध्ये वेटर म्हणून काम करीत होता. सुमारे सहा महिन्यांपूर्वी त्याला क्षयरोग असल्याचे निदान झाले. त्यातच तो हॉटेल वैष्णवीमधून काम सोडून निघून गेला. शनिवारी तो पुन्हा हॉटेल वैष्णवीमध्ये आला. त्यावेळी त्याची प्रकृती आणखीनच बिघडली होती.

हॉटेलमालक वसंत देवाडिगा यांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेले. तसेच याबाबतची माहिती त्याच्या कुटुंबीयांनाही दिली. गत दोन दिवस अशोक हॉटेल वैष्णवीमध्येच राहण्यास होता. सोमवारी हॉटेल मालकांकडून काही पैसे घेऊन तो गावी जातो, असे सांगून निघून गेला.

दरम्यान, बुधवारी पहाटे त्याने बसस्थानकानजीक असलेल्या रिकाम्या मैदानात हातावर काचेची रिकामी बाटली फोडून तसेच काचेने हाताची शीर कापून घेऊन त्याने आत्महत्या केली.

दुपारी ही घटना उघडकीस आल्यानंतर कऱ्हाड शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी त्याठिकाणी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला. घटनेची नोंद कऱ्हाड शहर पोलिसांत झाली आहे.

Web Title: Breaking bottle of Satara, youth's suicide, due to illness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.