शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

Satara: प्रियकराने लग्नासाठी प्रेयसीच्या पतीचा केला खून, दोघे अटकेत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2023 18:08 IST

नसीर शिकलगार फलटण: प्रेयसीसोबत लग्न करण्यासाठी प्रियकराने त्याचे साथीदारासह तिच्या पतीचा गळा आवळून खून करुन मृतदेहाचे हातपाय दोरीने बांधून ...

नसीर शिकलगारफलटण: प्रेयसीसोबत लग्न करण्यासाठी प्रियकराने त्याचे साथीदारासह तिच्या पतीचा गळा आवळून खून करुन मृतदेहाचे हातपाय दोरीने बांधून निरा उजवा कालवामध्ये टाकल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी फलटण पोलिसांनी शिताफीने तपास करुन मृताच्या पत्नीस अन् तिच्या प्रियकराला अटक केली. अद्याप एकजण फरार आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, रविवारी (दि.१७) रात्रीच्या सुमारास अजित पोपट बुरूंगले (वय २४, रा. नगरपरीषद शाळा क्रमांक ०७ पाठीमागे, शिवाजीनगर, फलटण) हा घरातून निघून गेल्याची तक्रार त्याच्या वडिलांनी फलटण शहर पोलिस ठाण्यात दिली होती. दरम्यान मंगळवारी (दि१९) विडणी गावच्या हद्दीत निरा उजवा कालव्यामध्ये एक मृतदेह सापडला. तपासाअंती हा मृतदेह अजितचा असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी अत्यंत शिताफीने तपास करीत असताना अजित याच्या पत्नीकडे चौकशी केली असता तिचे लग्नापूर्वी करण विठ्ठल भोसले (रा. थेऊर रोड, केसनंद, पुणे) याच्याशी प्रेमसंबंध असल्याचे उघडकीस आले. प्रेमसंबधास पतीचा अडथळा येत असल्याने करण भोसले याने त्याचा साथीदार राहुल उत्तम इंगोले याच्या मदतीने खुनाचा कट रचला. रविवारी (दि१७) रात्री त्याने अजित बुरुंगले याला फोन करून घराबाहेर बोलावून घेतले. यावेळी दोघांनी अजितचा दोरीने गळा आवळून खून केला. अन् हात पाय बांधून पुरावा नाहीसा करण्याचे उद्देशाने मृतदेह निरा उजवा कालव्यामध्ये टाकला. याबाबतची कबुली आरोपी करण विठ्ठल भोसले याने दिली असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांनी फलटण शहर पोलिस ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. या खून प्रकरणी अजितची पत्नी आणि करण भोसले यास अटक केली आहे. राहुल इंगोले हा फरारी असून अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस यांचे मार्गदर्शनाखाली सुनील शेळके करीत आहेत. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस