शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

खेळायला साडीचा झोपाळा बांधला, आई घराबाहेर गेली, अन्..; साताऱ्यातील वळसे येथील दुर्दैवी घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 16:19 IST

अंगापूर : घरात खेळण्यासाठी झोपाळा बांधत असताना अचानक फास लागून एका १२ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना ...

अंगापूर : घरात खेळण्यासाठी झोपाळा बांधत असताना अचानक फास लागून एका १२ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना वळसे, ता. सातारा येथे १ एप्रिल रोजी दुपारी बारा वाजता घडली. केवळ पंधरा मिनिटांसाठी आई घराबाहेर गेली होती. त्यावेळी हा प्रकार घडला.विश्वजीत प्रमोद चव्हाण (वय १२) असे गळफास लागून मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, विश्वजीत याचे वडील कामावर गेले होते. तर घरी विश्वजीत, त्याचा लहान भाऊ आणि आई होती. दुपारी बारा वाजता त्याच्या आईने त्याला ‘चल आपण महा-ई-सेवा केंद्रात जाऊन येऊ,’ असे सांगितले. परंतु त्याने ‘मी घरात खेळतोय. तू जा,’ असं आईला सांगितलं. त्यामुळे त्याची आई महा-ई सेवा केंद्रात गेली. विश्वजीतने झोपाळा बांधण्यासाठी आईची साडी घेतली. काॅटवर उभा राहून त्याने घराच्या छताच्या अॅंगलला साडी बांधली. परंतु साडीची लांबी जास्त असल्यामुळे साडी त्याच्या गळ्याभोवती गुंडाळली. अचानक काॅटवरून त्याचा पाय निसटल्याने त्याच्या गळ्याला फास लागला. त्याला आरडाओरडही करता आली नाही. अन्यथा त्याच्या आवाज ऐकून शेजारीपाजारी तरी त्याच्या मदतीला धावून आले असते. महा ई-सेवा केंद्रातील काम आटोपल्यानंतर त्याची आई पंधरा मिनिटांत परत घरात आली.

त्यावेळी विश्वजीतला फास लागलेला होता. हे पाहून आईने हंबरडा फोडला. आईच्या आवाजाने आजूबाजूचे लोक त्यांच्या घरात आले. विश्वजीतचा फास सोडवून त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. विश्वजीत हा इयत्ता सहावीमध्ये शिकत होता. तो हुशार आणि मनमिळावू स्वभावाचा होता. त्याच्या निधनामुळे वळसे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.बोरगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक धोंडिराम वाळवेकर तसेच अंमलदार म्हेत्रे, महिला पोलिस हवालदार मोनिका निंबाळकर यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. बोरगाव पोलिस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस