दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने एकावर बाटलीने वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 11:17 IST2019-12-17T11:17:07+5:302019-12-17T11:17:58+5:30

दारू पिण्यासाठी उसने पैसे न दिल्याने चिडून जाऊन चंद्रकांत उर्फ कांताप्पा पुंडलिक पवार (वय २४, रा. लक्ष्मीटेकडी, सदर बझार सातारा) याच्यावर एकाने काचेच्या बाटलीने वार केले. ​​​​​​​

Bottled on one without paying for alcohol | दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने एकावर बाटलीने वार

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने एकावर बाटलीने वार

ठळक मुद्देदारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने एकावर बाटलीने वार जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू

सातारा : दारू पिण्यासाठी उसने पैसे न दिल्याने चिडून जाऊन चंद्रकांत उर्फ कांताप्पा पुंडलिक पवार (वय २४, रा. लक्ष्मीटेकडी, सदर बझार सातारा) याच्यावर एकाने काचेच्या बाटलीने वार केले.

याप्रकरणी सुरज राजू माने (रा. लक्ष्मीटेकडी, सदर बझार सातारा) याच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, चंद्रकांत पवार हा दि. १५ रोजी रात्री साडेनऊ वाजता त्याच्या घराच्या बाहेर बसला होता.

यावेळी तेथे सुरज माने आला. त्याने दारू पिण्यासाठी पवार याच्याकडे उसने पैसे मागितले. परंतु पवार याने पैसे नंतर देतो, असे सांगितले. चिडून जाऊन माने याने तेथेच पडलेल्या मोकळ्या दारूच्या बाटलीने पवार याच्या उजव्या दंडावर वार केले. यात पवार हा जखमी झाला असून, जिल्हा शासकीय रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

Web Title: Bottled on one without paying for alcohol