बोनी कपूरच्या कारला अपघात ट्रॅक्टरचालक जखमी : तरडगावजवळ दुर्घटना; कारचे मोठे नुकसान

बोनी कपूरच्या कारला अपघात ट्रॅक्टरचालक जखमी : तरडगावजवळ दुर्घटना; कारचे मोठे नुकसान

साखरवाडी : चित्रीकरण संपवून लोणंदहून फलटणकडे निघालेले दिग्दर्शक व अभिनेते बोनी कपूर यांच्या कारला टॅÑक्टरची धडक बसली. यामध्ये ट्रॅक्टर चालक गंभीर जखमी झाला. हा अपघात बुधवारी रात्री नऊच्या सुमारास झाला. गेल्या काही दिवसांपासून लोणंद परिसरामध्ये एका चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे. सायंकाळी चित्रीकरण संपवून कारमधून (एमएच ०४ ५४००) दिग्दर्शक बोनी कपूर, अभिनेता संजीव कपूरसह अन्य कलाकार कारमधून लोणंदहून फलटणकडे निघाले होते. तरडगावपासून तीन किलोमिटर अंतरावर आले असता चुकीच्या दिशेने ट्रॅक्टर समोर आला. त्यामुळे बोनी कपूरच्या चालकाचे कारवरील नियंत्रण सुटून दोन्ही वाहने समोरासमोर जोरदार धडकली. यामध्ये ट्रॅक्टर चालक विजय गाडे (वय ३३ रा. तरडगाव, ता. फलटण) हा गंभीर जखमी झाला. अपघात झाल्यानंतर लोणंद पोलीस ठाण्याचे निरीक्षक केंद्रे यांनी कर्मचार्‍यांसह तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमी टॅÑक्टरचालकाला तरडगावमधील शासकीय रुग्णालयात दाखल केले, तर बोनी कपूर आणि इतर कलाकार दुसर्‍या कारने फलटणला गेले. बोनी कपूरच्या कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अपघातात कोणताही कलाकार जखमी झाला नाही, असे पोलीस निरीक्षक केंद्रे यांनी सांगितले. (वार्ताहर)

Web Title: Bony Kapoor's car injured in accident; tractor driver injured; Big loss of the car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.